वयाच्या चौथ्या वर्षी बापाचे छत्र हरपले आणि 24 व्या वर्षी जिद्दीने प्रथमेश झाला वाहतूक निरीक्षक!

प्रतिनिधी- सर्जेराव साळवे
श्रीगोंदा – जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव या छोट्याशा गावातील तरुण प्रथमेश चंद्रकांत बच्चे याची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहतूक निरीक्षक या पदावर नुकतीच निवड झाली.
लहानपणी वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले तेव्हापासून प्रथमेश उक्कडगाव येथे आपल्या आजोबा सुदाम महाराज लांडगे यांच्याकडे राहत असे. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कडगाव यथे तर माध्यमिक शिक्षण श्री मुंजोबा विद्यालय उक्कडगाव येथे झाले. चांदमदल ताराचंद बोरा शिरूर येथे बीबीए ची पदवी घेतली.
2017 मध्ये परीक्षा दिली होती त्यानंतर दोन वर्षे प्रतीक्षा यादीत नाव होतं त्यानंतर कोरोना आला आणि त्यानंतर संप चालू होता पण नशीब आणि जिद्द सोबत असल्याने प्रथमेश याचे नाव यादीत आले आणि आज प्रथमेश महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये वाहतूक निरीक्षक या पदी नियुक्ती होऊन शिरूर येथे प्रशिक्षण घेत आहे.
उक्कडगाव ग्रामस्थांच्या वतीने प्रथमेश चंद्रकांत बच्चे याचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच बाजीराव महाडिक, मोहन कातोरे, सुदाम महाराज लांडगे, आनंदा पवार,अमोल महाडिक, विलास महाडिक, दशरथ कातोरे, राहुल महाडिक , विकास महाडिक, किरण ,शिंदे, स्वप्नील पितळे, आदींसह ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने प्रथमेश चे अभिनंदन केले आणि भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या
बालपणी बापाचे छत्र हरपलं होत खेळण्याच्या वयात जबाबदारी अंगावर पार पडली होती.आईचे स्वप्न होते की मी खूप मोठ्या पदावर जावे. आज या पदावर गेल्याचा आनंद खूप होत असल्याचे प्रथमेश बच्चे यांनी सांगितले.