पोलिसांच्या वर्दीला दाग, पोलीस ठाण्यात महिलेला पगार देण्याच्या बहाण्यानं बोलवलं अन्

0 469

 कोल्हापूर –   मागच्या काही दिवसांपूर्वी पुणे (pune) मधील एका पोलीस निरीक्षका (Police inspector) वर एका २५ वर्षीय तरुणीने लग्नाचा आमिष दाखवून (Rape) बलात्कार केल्याच्या आरोप करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता हा प्रकरण ताजा असताना राज्यात परत एखादा पोलिसांच्या वर्दीला दाग लागण्याची घटना घडली आहे.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हातकणंगले पोलीस ठाण्यात साफसफाईचं काम करणाऱ्या एका महिलेची पोलीस ठाण्यात छेड काढण्यात आली आल्याची माहिती समोर आली आहे . पोलीस ठाण्यातील कारकूनानं महिलेला पगार ( salary)  देण्याच्या बहाण्यानं कार्यालयात बोलवून तिच्यासोबत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे.

ही संतापजनक घटना घडल्यानंतर पीडित महिलेनं या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यातील वरिष्ठांकडे केली असता, वरिष्ठ पोलिसांनी देखील हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पीडित महिलेवर दबाव टाकून झालेल्या घटनेबाबत कोणतीही तक्रार नसल्याचं कॅमेऱ्यासमोर बोलायला भाग पाडलं आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित संशयित आरोपी कारकूनाला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

 हे पण पहा –  सरकारी पाहुण्यां’ची चिंता नाही ! | प्राप्तिकर छाप्यांबाबत शरद पवारांचे वक्तव्य

Related Posts
1 of 1,608

मिळालेल्या  माहितीनुसार, पीडित महिला हातकणंगले पोलीस ठाण्यात रोजंदारीवर साफसफाईचं काम करते. पीडित महिला गुरुवारीही नेहमीप्रमाणे पोलीस ठाण्यात काम करण्यासाठी आली असता, संबंधित कारकूनानं तिला आपल्या कार्यालयात बोलवलं. याठिकाणी पगार देण्याचा बहाणा करत आरोपीनं पीडित महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे.पीडित महिलेनं हा प्रकार पोलीस ठाण्यातील अन्य कर्मचाऱ्यांना सांगितला, त्यानंतर हे प्रकरण पोलीस निरीक्षकापर्यंत पोहोचलं. यानंतर त्यांनी पीडित महिलेची समजूत काढून पोलीस ठाण्याची बदनामी टाळण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी माहिती देताना, पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी सांगितलं की, पीडित महिलेनं याबाबत कोणतीही तक्रार केली नाही, त्यामुळे कारवाईचा प्रश्नच निर्माण होत नाही. पीडितेनं तक्रार दाखल केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

‘एका रात्रीसाठी खेळाडूनं ऑफर केली मोठी रक्कम’,प्रसिद्ध मॉडेलचा गौप्यस्फोट

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: