श्रीगोंदयात महिलांचा तिरस्कार त्यामुळे उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार..

0 792
Hatred of women in Shrigonda, therefore boycott of inauguration program ..
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
 श्रीगोंदा  :-  शनिवार दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बेलवंडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवीन इमारतीचा आयोजित केलेल्या उद्घाटन समारंभ हुकूमशाही व मनमानी पद्धतीने आयोजित केला असून, ग्रामस्थांचा व संस्थेच्या सभासदांचा अवमान करणारा असल्यामुळे बेलवंडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ या हुकुमशाहीचा निषेध करून कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन ज्ञानदेव माऊली हिरवे,नागवडे कारखान्याचे संचालक, सावता हिरवे, भिमराव लबडे, माजी संचालक अशोकराव काळणे,गोपीचंद दादा इथापे,भैरवनाथ सेवा संस्थेचे माजी चेअरमन दिनेश आबा इथापे,संग्राम पवार डॉ.अशोक शेलार मधुकर शेलार संदीप आरकस जयश्री शेलार,मधुकर काळाणे, संतोष काळाणे, राहुल इथापे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिलेले आहे.
वास्तविक भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ही अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अर्थसाहाय्याने व आश्रयाखाली चालणारी संस्था आहे. संस्थेने सर्व सभासदांच्या व जिल्हा सहकारी बँकेच्या मदतीने नवीन अध्यावत इमारतीचे बांधकाम केलेले आहे. यामध्ये सर्वांचे योगदान आहे. परंतु, शनिवारी दिनांक 2 रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित केलेल्या उद्घाटन समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेत जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका तथा जिल्हा परिषदच्या माजी सभापती तसेच अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मा.सौ.अनुराधाताई नागवडे यांचे नाव नाही.! तसेच गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ.सुप्रियाताई पवार यांचेही नाव नाही.
Related Posts
1 of 2,357
कारखान्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव माऊली हिरवे व इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांची नावे अत्यंत लहान अक्षरात टाकलेले आहेत व त्यांना कार्यक्रमाच्या निमंत्रण ही दिले नाही. ही बाब अत्यंत निषेधार्ह असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांनी अतिशय मनमानी व हुकूमशाही पद्धतीने तसेच सामाजिक परंपरेला छेद देऊन स्वतःची शेखी मिळवण्याकरिता कार्यक्रम आयोजित केलेला आहे.  स्वतःला गावचे नेते म्हणून घेणारे एकदम खालच्या पातळीवर जाऊन केवळ राजकीय द्वेषापोटी पदाधिकारी व ग्रामस्थांना अपमानित करून जर कार्यक्रमांचे नियोजन करत असतील तर ही बाब अतिशय घृणास्पद आहे.
राजकारणाच्या वेळी राजकारण जरूर करावे. परंतु, संस्थेच्या व सार्वजनिक कार्यक्रमावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. याची जाणीव ठेवणे आवश्यक असताना, केवळ तालुक्यात नागवडे यांचे वाढते वर्चस्व सहन होत नाही म्हणून, विद्यमान जिल्हा बँकेच्या संचालिकाव गावच्या सरपंच असुन, त्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत टाकले नाही. ही गोष्ट अतिशय गंभीर तसेच चुकीचे आहे. आम्ही सर्वजण याबाबत जाहीर निषेध करत असून, आम्हीच बांधलेल्या सोसायटीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाला हेतुपूर्वक बहिष्कार टाकत आहोत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: