पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर मिळते हातभट्टी मात्र ..

श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हातभट्टीच्या (Hatbhatti) दारू विक्रीचा अवैध व्यवसाय राजरोसपणे जोरात चालू असून येथून दारू पिऊन आलेल्या दारुड्यांचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असून या दारू विक्रेत्याकडे श्रीगोंदा पोलिसांनी तसेच उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी ( अर्थपूर्ण ) दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून या अवैध व्यवसायावर पोलिस तसेच उत्पादन शुल्क कारवाई करणार का ? अशी चर्चा परिसरात आहे.
Related Posts
श्रीगोंदा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रसंत श्री शेख महंमद महाराज यांच्या समाधी असून या मंदिर परिसरात अवैध व्यवसायिकांचा हातभट्टी दारू विक्रीचा अवैध व्यवसाय राजरोसपणे जोरात चालू असून परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच मंदिरात दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना या दारुड्यांचा मोठा त्रास होत आहे. दारू पिऊन तर्र झालेले दारुडे या परिसरात शिवीगाळ करत रस्त्याने जाताना अश्लील वर्तन करत असल्याने रस्त्याने जाणाऱ्या महिलांची कुचंबना होत आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील श्रीगोंदा पोलीस तसेच उत्पादन शुल्क चे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत असल्याने श्रीगोंदा पोलिस, उत्पादन शुल्क आणि अवैध व्यवसाय व्यावसायिकांचे अर्थपूर्ण संबंध तर नाही ना ? अशी चर्चा परिसरातील नागरिक करत आहेत या अवैध व्यवसायांवर श्रीगोंदा पोलीस तसेच उत्पादन शुल्क कारवाई करणार का ? याची चर्चा परिसरातील नागरिक करत आहेत.
राष्ट्रसंत श्री शेख महंमद महाराज यांच्या मंदिर परिसरात अवैध व्यवसाय राजरोस चालू असून या व्यवसायाकडे पोलिसांनी तसेच उत्पादन शुल्क च्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून या अवैध व्यावसायिकांवर कारवाई केली नाही तर या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगत प्रहार संघटनेच्या वतीने श्रीगोंदा तहसिल कार्यालय समोर उपोषण करणार असल्याचे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बापूराव माने यांनी सांगितले.