हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा लवकर बाहेर काढणार – किरीट सोमय्या

0 193

अहमदनगर –  राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गुंड माफियांचे आहे. त्यांचे ठेकेदार आणि शिष्य सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी घाबरणार नाही. तीन दिवसांत आणखी तीन बड्या नेत्यांची प्रकरणे हाती आली आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)  यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार आहे. काही केले तरी मी कोल्हापूरला जाणारच ’ असे आव्हान भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिले.

किरीट सोमय्या यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील साखर कारखान्याला भेट दिली. या कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार कारखाना बचाव समितीने त्यांच्याकडे केली होती. त्यानुसार सोमय्या पारनेरला आले होते. त्यांनी कारखान्याचे कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला.

बलात्कार पीडितेची आत्महत्या, सुसाईड नोट मधून धक्कादायक माहिती उघड

Related Posts
1 of 23

पारनेर कारखान्याच्या बाबतीत बचाव समिती मला येऊन भेटली. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी लक्ष घालण्याची सूचना केली. त्यामुळे मी येथे आलो आहे. यामध्ये पक्षीय संबंध येत नाही. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार आहे. जसे घोटाळे काढत आहे तसतशी माझी किंमत वाढत आहे त्यांच्या धमक्या मी थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली .तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे घोटाळे करणाऱ्यांना वाचवत असल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला आहे .

 हे पण पहा  – Ahmednagar breaking news | आयुर्वेद कॉनर जवळ बर्निंग कारचा थरार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: