किरीट सोमय्यांच्या आरोपांना हसन मुश्रीफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले….

0 235
 नवी  मुंबई –   अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहे. हे आरोप लावताना त्यांनी तब्बल २ हजार ७०० पानाचे पुरावे देखील सादर केले आहे. या आरोपांना आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी उत्तर देत किरीट सोमय्या यांच्यावर दोन आठवड्यांमध्ये १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं देखील मुश्रीफ यांनी यावेळी म्हटले आहे.
 

हसन मुश्रीफ यांनी यावेळी कोल्हापूरमधील साखर कारखान्याविषयी किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं. हजारो शेतकऱ्यांनी यामध्ये पैसे गुंतवले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना आपला कारखाना हवा होता. त्यावेळी सरकारने सहकारी कारखान्यांची नोंदणी बंद केली होती. म्हणून हा प्रायव्हेट लिमिटेड कारखाना काढावा लागला. ज्या दिवशी आम्हाला परवाना मिळाला आणि आवाहन केलं, तेव्हा एकाच दिवशी १७ कोटी रुपये जमा झाले. ४ दिवस लोक नोटा मोजत होते. कारण सगळ्या शेतकऱ्यांना ५, १०, ५० रुपयांच्या देखील नोटा दिल्या होत्या. त्यानंतर हजारो लोकांनी पैसे दिले. त्याची देखील कोल्हापूरच्या आयकर विभागाकडून तपासणी झाली. हजारो शेतकऱ्यांची चौकशी झाली. बँकांची पासबुक देखील तपासली. त्यानंतर देखील हे पैसे आले, असं मुश्रीफ म्हणाले.

हे पण पहा – वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की  

 सोमय्यांना काहीही माहिती नाही

Related Posts
1 of 1,635

त्या कारखान्यासाठी आम्ही भागभांडवल गोळा केलं, राष्ट्रीयीकृत बँकांच्या वतीने पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, महाराष्ट्र बँक अशा अनेक बँकांच्या मदतीने हा कारखाना उभा केला. त्याची कर्जफेड देखील झाली आहे. आता नववा हंगाम आला आहे. याची काहीही माहिती किरीट सोमय्या यांना नाही, असं मुश्रीफ म्हणाले.

किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा दावा ठोकणार

येत्या २ आठवड्यांत किरीट सोमय्यांवर फौजदारी अब्रू नुकसानीचा १०० कोटींचा दावा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात करत आहे. जेव्हा ते तारखेला येतील, तेव्हा त्यांनी माहिती घ्यावी. मग त्यांच्या लक्षात येईल की भाजपा कोल्हापूरमधून सपाट झाला आहे. पुढील १० वर्ष देखील भाजपाला स्थान नाही. चंद्रकांत पाटील यांनी देखील हायब्रिड अॅन्युइटी बांधकामात जो भ्रष्टाचार केला आहे त्यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार करणार आहे, असं देखील हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

कोकणात होणार मोठा उलटफेर,नारायण राणेंची जागा निलेश राणे लढवणार?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: