किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता हसन मुश्रीफ, लावला भ्रष्टाचाराचा आरोप

0 273

नवी मुंबई –  माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते  किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषद घेऊन परत एखादा महाविकास आघडी सरकारमधील आणखी एक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहे .  अनिल परब (Anil Parab) , अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्यानंतर  आता किरीट सोमय्या यांनी  राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif)  यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी  पत्रकार परिषदेत जाहीर केलं. तसेच, फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचं ते म्हणाले.

किरीट सोमय्या म्हणाले की  मी राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांचं नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, सेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले  मरू भूमी कंपनीत ३ कोटी ५ लाख रक्कम दाखवली आहे. बाप-बेटे दोघांविरोधात १२७ कोटींचे तर पुरावे आहेत आमच्याकडे. हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या अकाऊंटमध्ये सर संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० रुपयांचे शेअर्स दाखवले आहेत. शाएदा हसन मुश्रीफ यांच्या नावाने. २०१८-१९ मध्ये मुश्रीफ परिवारावर आयकर विभागाचे सर्च झाले. त्यातून आलेली माहिती दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यात १४७ कोटी रुपयांचे पुराव्यानिशी बेनामी व्यवहार सिद्ध झाले आहेत. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाने सर सेनापती संताजी-धनाजी साखर कारखान्यात १०० कोटींहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला आहेत, असे गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

धक्कादायक ! पाण्यात बुडून सख्ख्या दोन बहिणींच्या मृत्यू ….

Related Posts
1 of 1,635

 ईडीकडे तक्रार करणार

उद्या मुंबई ईडीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार आहे. २७०० पानांचे पुरावे त्यांना देणार आहे. परवा दिल्लीला अर्थविभाग, ईडी, कंपनी मंत्रालय इथे देखील हे पुरावे मी सादर करणार आहे. ठाकरे सरकारच्या डर्टी घोटाळा ११ मध्ये राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे २ मंत्र्यांच्या फाईल तयार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. आज एनसीपीच्या एका मंत्र्याचा घोटाळा उघड केला आहे. काही दिवसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचा देखील घोटाळा उघड करू, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

हे पण पहा – वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: