श्रीगोंदा शहरातील अतिक्रमणावर पोलिस बंदोबस्तात हातोडा..

0 575
Hammer in police protection on encroachment in Shrigonda city ...

 

श्रीगोंदा   – श्रीगोंदा (Shrigonda) शहरामध्ये अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेला मुख्य विषय म्हणजे शहरातील वाढत असलेले अतिक्रमण. हे अतिक्रमण दि.२५ मे ते दि.२८ मे २०२२ रोजी या कालावधीत मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याची माहिती श्रीगोंदा नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिली आहे. त्या अनुषंगाने आज प्रत्यक्षात पोलीस निरिक्षक रामराव ढिकले यांचे मोठ्या फौजफाट्यासह, नायब तहसीलदार पंकज नेवसे, पंचायत समितीचे अधिकारी व नगरपरिषदेच्या सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचा-यांच्या उपस्थितीमध्ये अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.

 

या कारवाईमुळे काही धिट अतिक्रमणधारकांचे धाबे यामुळे दणाणले आहेत. या मध्ये मुख्यत: नगरपरिषद हद्दीतील दौंड-जामखेड रस्ता, मांडवगण रस्ता, शनिचौक ते जोधपुर मारुती रस्ता, शनिचौक ते वडाळी रस्ता अश्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात झाली आहे. अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यासाठी दंगल नियंत्रण पथकाचा व पोलिसांचा खुप मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अतिक्रमण हटविण्याबाबत श्रीगोंदा नगरपरिषदेने वर्तमानपत्रात जाहीर नोटीस दिली होती. तसेच स्पिकर गाडी ही फिरविली होती. त्यामुळे अनेक सर्वसामान्य व्यवसायिकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

 

 

Related Posts
1 of 2,357

दरम्यान ज्या टपरीधारक व्यवसायिकांचे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे त्या व्यवसायिकांना पालिकेने व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र तो फार्स आहे की वस्तुस्थिती? हे मात्र गुलदस्त्यातच राहिल्याचे दिसते. तर दुसरीकडे अतिक्रमण हटविल्यामुळे शहराचा श्वास मोकळा होणार असून वाहतुकीस होणारा अडथळा दूर होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया सुजाण नागरिकांनी व्यक्त करत आहेत. नगरपरिषदे ने केलेल्या या कारवाई मुळे सर्वसामान्य जनतेकडून कौतुक होत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: