दिल्ली – ज्ञानवापी मशीद प्रकरणी (Gyanvapi Masjid) वाराणसी न्यायालयात (Varanasi court) सुनावणी पूर्ण झाली आहे. वाराणसी कोर्टाने मोठा निर्णय देत कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. याशिवाय सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी वाराणसी कोर्टाने कोर्ट कमिशनरला दोन दिवसांची मुदतही दिली आहे. मात्र न्यायालयाने आयुक्तांचे सर्व अधिकार काढून घेतले आहेत. आता त्यांच्या जागी दोन दिवसांत विशाल सिंग आयुक्त म्हणून सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर करणार आहेत.
सुनावणीदरम्यान आयुक्तांवर माहिती लीक केल्याचा आरोप होता, त्यानंतर न्यायालयाने त्यांना तात्काळ प्रभावाने पदावरून हटवले. आयुक्तांवर पक्षपातीपणाचा आरोपही करण्यात आला आहे. आता उर्वरित दोन अजय प्रताप आणि विशाल सिंग हे कोर्ट कमिशनर म्हणून कायम राहणार आहेत. वुजुखानाच्या ठिकाणी शिवलिंग दिसल्याचा दावा केल्यानंतर हिंदू बाजूने भिंत पाडण्याची मागणी केली असून त्यावर बुधवारी न्यायालय निकाल देणार आहे.
दुसरीकडे, या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, जिथे मुस्लिम पक्षाने खालच्या न्यायालयाच्या सर्व निर्णयांना स्थगिती देण्याची मागणी केली आहे. मात्र सध्या न्यायालयाने यावर कोणताही निर्णय दिलेला नाही.