श्रीगोंद्यात २५ हजाराचा गुटखा पकडला …, गुन्हा दाखल

0 429
श्रीगोंदा;-   श्रीगोंदा शहरात बस स्थानक परिसरातील गुटख्याचा (Gutkha)  साठा असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या गुप्त माहितदाराकडून मिळताच पोलिसांनी सुरक्षाअधिकारी,अन्न व औषध प्रशासन,यांच्याशी संपर्क साधून छापा मारला असता तब्बल २५  हजार ४०३ रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत गेला आहे.
 राज्य सरकारने गुटख्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात निर्दन्ध घातले असतानाही व्यसनाधीन लोकांना तो अगदी सहज उपलब्ध होताना दिसत आहे . त्यामुळे गुटखा बंदी फक्त कागदावरच आहे कि काय असा सवाल जनमाणसातून उपस्थित केला जात आहे याचा पार्श्वभूमीवर श्रीगोंदा पोलिसांना श्रीगोंदा शहरातील रोकडोबा चौकात राहणारे  रवी बबन दळवी,वय 36 वर्ष,रा.रोकडोबा चौक,श्रीगोंदा,ता.श्रीगोंदा,जि.अ.नगर याचे बस स्थानक परिसरात साक्षी ट्रेडर्स नावाचे दुकान आहे.
Related Posts
1 of 1,603
 या दुकानात यांच्या जवळ मोठ्या प्रमाणात गुटखा साठा असल्याची माहिती पोलिसाना मिळाली त्यानुसार त्यांनी उमेश राजेंद्र सुर्यवंशी,वय 32 वर्ष,सुरक्षाअधिकारी,अन्न व औषध प्रशासन यांच्याशी संपर्क साधून सापळा रचून त्यात हिरा पानमसाला,रोयॉल 717 तंबाखू,प्रीमीयम आर.एम.डी.पानमसाला, एम.सेंटेड तंबाखू गोल्ड,विमल पानमसाला,व्ही 1  सुमारे  25403/-रु.किं.चे गुटखा पकडला आहे.  त्यानुसार रवी बबन दळवी,वय 36 वर्ष,रा.रोकडोबा चौक,श्रीगोंदा यांचेवर भा.द.वि का.कलम 188,272,273,328 व अन्न सुरक्षा मानके अधि- 2006 चे  व त्याखालील नियम व नियमने 2011 चे 26(2)(i),26(2)(iv),3(1)(zz)  3(1)(zz), 27(3)(e), नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास  पोसई अमित माळी हे करत आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: