गुटख्याचा मास्टर माईंड अमोल अजबे; ‘त्या’ प्रकरणात वाचण्यासाठी पोलिसांनी केले सद्दाम पठाण व समीर सय्यद यांना आरोपी – आदम शेख

श्रीगोंदा :- श्रीगोंदा काष्ठी रोडवर गुटखा कारवाई मध्ये पोलिसांनी आपला बळी जातोय हे लक्षात आल्यावर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बनावट आरोपीकडून जबरदस्तीने जबाब वदवून घेऊन गुटखा प्रकरणात स्वतः वाचण्यासाठी पोलिसांनी केले सद्दाम रशिद पठाण व समीर शब्बीर सय्यद यांना आरोपी केल्याचा आरोप राजधानीचे रहिवाशी आदम शेख यांनी निवेदनातून केला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा – काष्ठी रोडवर हॉटेल अनन्या जवळ पोलिसांनी बनाव करत गुटख्याची गाडी लुटली मात्र काही काळात प्रकरण अंगाशी येतेय असे लक्षात आल्यावर पोलिसांनी ताब्यात घेतलेला बनावट आरोपी कडून पोलिसांनी वदवून जबाब घेतले व त्यात आरोपी सद्दाम रशिद पठाण व समीर शब्बीर सय्यद यांना विनाकारण गुन्ह्यात गोवून त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला मात्र यामध्ये त्यांचा काडीमात्र संबंध नाही असेही शेख यांनी निवेदनात सांगितले आहे.
श्रीगोंदा पोलीसांनी हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक या दोघांना आरोपी केले आहे . या सर्व प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन व्यक्तीशः सखोल चौकशी करण्यात यावी . सद्दाम पठाण , समीर सय्यद व उमेश वेताळचा कसलाही संबंध नाही उमेश वेताळ या व्यक्तीला ओळखत देखील नाही . तसेच त्याचे व आरोपीचे कोणत्याही प्रकारचे संभाषण झाले नाही . तसेच कुठलाही फोन कॉल नाही किंवा आम्ही एकमेकांना ओळखत नाही . तरीही त्यांचे फोन कॉलींग तपासण्यात यावे किंवा आमचे मोबाईल लोकेशन घेण्यात यावे . गुटख्याच्या या गुन्हयातील मुख्य आरोपी हे स्वतः पोलीस कॉन्स्टेबल आमोल आजबे आहेत. आजबे यांनी गुटख्याचा बनाव करुन आरोपी उमेश वेताळ याला पैसे देऊन ‘ तुझ्या अंगावर गुन्हा घे , मी पोलीस आहे . तुला कुठल्याही प्रकारची अडचन येणार नाही . ह्याची जबाबदारी घेतो आणि तुला एक लाख रुपये देतो , आतमध्ये गेल्यानंतर सद्दाम पठाण व समीर सय्यद ह्या दोघाचे नावे घ्यायची या नंतर मी बाकीचे पाहुण घेतो ‘ असे दहशतीने सांगितले .
सर्व गुन्हा कसा घडला हे अमोल अजबे याला माहित असतानाही ते गप्प आहेत घटना घडली त्यावेळी म्हणजे ८ तारखेला सायंकाळी ११ ते १४ च्या दरम्यान १ दिवस पुर्ण . गावात कुठलीही चर्चा नव्हती हा गुन्हाच मुळात सद्दाम पठाण व समीर सय्यद यांनी उघड केला आहे . याचा राग येऊन सद्दाम पठाण व समीर सय्यद यांना आरोपी करण्याचे ठाणले . अमोल आजबे यांचे ७ तारखेपासून ते दि . १२/०४/२०२२ पर्यंत सर्व कॉलचे डिटेल घेण्यात यावेत. हे संपूर्ण प्रकरण अमोल आजबे यांना माहित होते . आरोपी कोण होते हे देखील त्यांना माहित . आहे . परंतू सद्दाम पठाण व समीर सय्यद यांनाच आजबे यांनी या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवले आहे . या प्रकरणाची वर्तमानपत्रामध्ये व तालुक्यात चर्चा झाल्याने उमेश वेताळ याला रक्कम रुपये १ लाख देऊन चोरीच्या प्रकरणात आरोपी केले गेले . गुटख्याचा गुन्हा घडलेली तारीख १०/०४/२०२२ रोजी पहाटे ३.३० वाजता पोलीस कर्मचारी प्रकाश नवनाथ मांडगे याने चुकीची फिर्याद दिलेली आहे .त्यामुळे मुकेशकुमार बडे तसेच अमोल अजबे यांचे मोबाईल कॉल डिटेल घ्यावेत त्यानूच त्यांचे सर्व प्रेमाचे संबंध उघड होतील असेही राजधानी येथील रहिवाशी आदम शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.
या आशयाचे निवेदन त्यांनी गृहमंत्री साहेब , महाराष्ट्र राज्य , मंत्रालय , मुंबई तसेच पोलीस महासंचालक साहेब , महाराष्ट्र राज्य मुंबई, मा . मुख्य सचिव साहेब , महाराष्ट्र राज्य , मंत्रालय , मुंबई , प्रधान सचिव साहेब , गृह विभाग , महाराष्ट्र राज्य , मंत्रालय , मुंबई, मा . विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब , नाशिक परिक्षेत्र , नाशिक ,पोलीस अधीक्षक साहेब , अहमदनगर,उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिले आहे तर काहींना रजिस्टर पोस्टाने पाठवले असल्याचे आदम शेख यांनी सांगितले.