श्रीगोंदा :- श्रीगोंदा काष्ठी रोडवर झालेल्या गुटखा कारवाई (Gutkha case) मध्ये पोलिसांनी लूटमार करून गुटखा विकला असून मुख्य सूत्रधार अमोल अजबे याचे मोबाईल कॉल डिटेल तपासावे पोलिसांच्या हातात मोठे घबाड लागणार आहे असेही आदम शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा काष्ठी रोडवर दि 8 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत लाखोंचा गुटखा हस्तगत केला पण सरकारी दप्तरी मात्र किरकोळ गुटख्याची नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला प्रकरण अंगाशी येतेय असे लक्षात आल्यावर पैशे देऊन बनावट आरोपी अटक केला मात्र त्याचा कारवाई साठी अहवाल पाठवल्यावर तो मंजूर झाल्यावर बनावट आरोपी उमेश वेताळ यांच्या लक्षात आले की आपण पोलिसांसाठी गुन्हा अंगावर घेतला आणि पोलिसच आपल्याला गुंतवत आहेत त्यावेळी उमेश वेताळ पोलीस यांच्याबाबत खरे सांगण्यास सुरवात केली मात्र या जबाबात पोलीस अडकत असल्याने पुन्हा उमेश वेताळ यांना बोलावून घरच्यांना राजकीय नेत्यांच्या हाती लागून पोलिसांकडून दमबाजी करून जबाब बदलण्यासाठी भाग पाडले तसेच राजधानीच्या विविध नेत्यांची मनधरणी करून अनेकांवर अमोल अजबे यांनी दबाव आणला तसेच गुटखा प्रकरणातील तालुक्यातील सर्व व्यावसाईक किरकोळ विक्रेते तसेच ठोक विक्रेते यांच्याशी अमोल अजबे यांचे सलोख्याचे संबंध आहेत आणि त्या संबंधाचे पुरावे पोलिसांना जर हवे असतील तर पोलिसांनी पोलीस शिपाई अमोल अजबे यांच्या दोन्ही मोबाईल चे लोकेशन आणि कॉल डिटेल तपासले तर यामध्ये गुटखा कंपनीचे लोक , डीलर,होलसेल विक्रेता ,वाहतूकदार ,तालुक्यातील लोकल डीलर,तसेच किरकोळ विक्रेते यांचे सोबत मोबाईल वर बोललेले कॉल डिटेल पोलिसांना नक्कीच सापडतील त्यामुळे पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल तपासावे अशी मागणी निवेदनातून आदम शेख यांनी निवेदनातून केली आहे.
गुटख्याचे धागेदोरे श्रीगोंघ्या सोबत कर्जत पोलीस ठाण्यातही ?
कर्जत तालुक्यातुन सोलापूर नगर महामार्ग जातो या महामार्गावरून गुटख्याची करोडो रुपयाची वाहतूक होते त्यात काही पोलीस लखपती झाल्याची चर्चा आहे मात्र याबाबत पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालय यांना कोणत्याही प्रकारचा थांगपत्ता नसल्याचे दाखवले जाते मात्र काही धागेदोरे कर्जत मधेही असल्याची शंका नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
काही पोलीस नेमणूक आहे त्या ठिकाणी नाहीतच ?
उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या कालावधीत मध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरू असून त्याच्या अंतर्गत 4 पोलीस ठाणे असून ज्या ठिकाणी नेमणूक आहे त्या ठिकाणी पोलीस आजपर्यंत हजर झालेच नाही ते फक्त कागदपत्री त्या ठिकाणी हजर आहेत याकडे अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.