श्रीगोंदा पोलिसांची गुटखा कारवाई पोलिसांच्या अंगलट ?; अनेक चर्चांना उधाण

0 540
Former Sub-Panchna beaten up by Nandkumar Dudhal, Inspector of Police, Belwandi Police Station
 श्रीगोंदा :- श्रीगोंदा पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.  श्रीगोंदा काष्टी रोडवर हॉटेल अनन्या जवळ पोलिसांनी ( Shrigonda police) मिळालेल्या माहिती नुसार कारवाई केली खरी पण ही कारवाई पोलिसांच्या चांगलीच अंगलट आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी कोणतेही सरकारी काम न करता सारखे पुढे पुढे करून आपली पोळी भाजून घेत दिवस काढत होता मात्र काही दिवसापूर्वी श्रीगोंदा काष्टी रोडवर कर्नाटक येथून भरून आलेला ट्रक भर गुटखा एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या जवळील नशेबाज मित्र सोबतीला घेऊन गुटखा लुटला व आणि तो दुसऱ्या गुटखा विक्रेत्याला विकला.  मात्र याबाबत वर्तमाणपत्रातून मोठ्या प्रमाणात बातम्या झळकल्या आणि पोलिसाचे डोळे उघडले.
 त्याच्या लक्षात आले कि प्रकरण आता अंगलट आल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांनी लिंपणगाव येथील पोलिसाचा मित्र यास फोनकरून सांगितलं कि जरा घोळ झाला आहे आपल्याला प्रकरण दडपन्या साठी काहितरी करावे लागेल मात्र तेथून पोलिसांनी आपल्या साथीदारासोबत मास्टर प्लॅन तयार केला त्यानुसार लाखो रुपये देऊन बनावट आरोपी जेलमध्ये बसवयाचा त्याला सोडण्याची संपूर्ण जबाबदारी पोलिसाने उचलली त्यानुसार एकाला पिकअप सह बोलावून घेऊन अटक करण्यात आली मात्र याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत श्रीगोंदा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकारणाची सखोल चौकशी करून कारवाई करणार असल्याचे माध्यम प्रतिनिधी यांना सांगितले. मात्र याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून विभागीय पोलीस उपाधीक्षक यांना सदर प्रकारामध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश मिळाले आहेत तसेच श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांना आज नाशिकवारी आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे त्या चोरी करणाऱ्या पोलिसाला आपल्या केलेल्या कामाचे फळ मिळणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पहिली चोरी पचली  म्हणून दुसरी केली
Related Posts
1 of 2,427
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या त्या पोलिसाने तालुक्यातील काष्टी या ठिकाणी गुटख्याचे गोडावून लुटल्याची चर्चा आहे त्यात काहीही झाले नाही त्यामुळे आता गुटख्याचा ट्रक लुटला आहे त्यामुळे जनतेमधून पहिली चोरी पचली  म्हणून दुसरी केली पण दुसरी चांगलीच अंगलट आली आहे असे खुलेआम बोलले जात आहे.
त्रास दिल्याने गुटखा तस्करव इतर व्यवसाईक  एकत्र येऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना माहिती देणार?
सबंधित  पोलिसाने पोलीस निरीक्षक तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या नावाखाली अनेक व्यवसाईक यांना अनेकदा अनेक प्रकारे त्रास दिला आहे त्यामुळे आता याबाबत सर्व व्यवसाईक यांना एकत्र घेऊन पोलीस अधीक्षक यांच्या समोर त्या पोलिसाच्या कारणांम्याचा पाढा वाचणार आहोत व सर्वाना न्याय देण्याची मागणी करणार असल्याची माहिती व्यवसाईक यांनी दिली आहे
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: