शहरातील मध्यवर्ती भागात तब्बल अकरा लाखांचा गुटखा जप्त, तीन आरोपी अटक

0 259

अहमदनगर – अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने  कारवाई करत महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या १० लाख ८० हजार ९६८ रुपये किंमतीचा गुटखा पानमसाला, तंबाखू आणि वाहनासह तीन आरोपीना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि . ०६ सप्टेंबर रोजी अनिल कटके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गोपनिय माहिती मिळाली कि, नगर शहरामध्ये काही इसम हे कोटला चौक, फलटण चाकी समोर मारुती स्विफ्ट नं. एमएच-२५-एल-७७७३ या गाडी मधून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा विक्री करण्यासाठी स्टेट बँक चौकाकडून घेवून येत आहेत. आता लागलीच कोटला ,फलटण चौकी समोर या ठिकाणी जावून सापळा लावल्यास मिळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर पथकातील सपोनि/गणेश इंगळे, सपोनि/सोभनाथ दिवटे, सफी/ मन्सूर सय्यद, पोहेकॉ दिनेश मोरे, संदीप घोडके, संदीप पवार, पोना/शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, पोकों/कमलेश पाथरुट अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने कोटला चौक, फलटण चौकीसमोर जावून सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच बातमी मधील नमुद क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर स्टेट बँक चौकाकडून येताना दिसली पथकातील अधिकारी, अंमलदार यांची खात्री झाल्याने यांनी एकाच वेळी रस्त्यावर येवून कार चालकाला थांबण्याचा इशारा केला असता कार चालकानी कार रस्त्याचे कडेला थांबविताच कार चालक व त्याचे समावेत असलेल्या दोन इसमांना ताब्यात घेतले.

त्यांना पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यांना त्यांची नावे, पत्ते विचारले असता त्यांनी आनंत विलास भालेकर (वय ३९ रा. तेरखेडा ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद ,मारुतो डिझायर कार नंबर एम एच २५ एल ७७७३ वरील चालक), जमीर अब्दुल सत्तार मुला (वय ३८ वर्षे रा. तेरखेडा ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद) ,अविनाश चंद्रकांत हालकरे (वय ३० रा. तेरखेडा ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद)  असे असल्याचे सांगीतले.   त्यांचे कारचे झडतीचा उद्देश कळवून त्यांनी कारची झडती  घेण्यास होकार दिल्यानंतर पंचासमक्ष कारची झडती घेतली असता कारमध्ये रु ९,८०,९६८ सुपारी मिश्रीत पानमसाला, वि – १ तंबाखू कंपणीचे तंबाखू व मारुती डिझायर कंपणीची पांढऱ्या रंगाची कार असा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

त्यानंतर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाला बाबत व वाहनांचे मालकाबाबत ताब्यात आनंत विलास भालेकर याला विचारपूस केली असता त्यांनी मारुती डिझायर कार नंबर एम एच २५ एल ७७७३ ही माझ्या मालकीचे आहे व त्यामध्यील माल जमील शेख रा. तेरखेडा ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद (फरार) (पुर्ण नाव माहित नाही ) याचे मालकीचा असल्याचे सांगितले.

Related Posts
1 of 1,608

हे पण पहा – अहमदनगर जिल्ह्याला पावसाने झोडपले

वरील नमुद आरोपी हे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा व तंबाखू विक्री करण्याचे उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द पोकॉ/ २५०३ कमलेश हरिदास पाथरुट, वय ३० वर्षे, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी तोफखाना पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ७७५/२०२९ भावि कलम १८८, २७२, २७३, ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही तोफखाना पो स्टे करीत आहेत. सदरची कारवाई  मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, सौरभकुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, व  विशाल दुमे  उपविभागीय पोलीस अधीकारी, शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.

संगमनेर मध्ये दोनशे पार तर आज जिल्ह्यात इतक्या रुग्णांची नोंद

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: