गुटखा तस्करीत पोलीस झाले कोट्याधीश; स्थावर जंगम मालमत्ता वाढवली

0 142
Gutkha, pot, liquor sales in full swing, the world is ruined, the eyes of the police

 

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील पोलीस गुटखा तस्करीत मोठया प्रमाणात कोट्यवधी रुपये कमवून मोठ्या प्रमाणात मालामाल झाल्याने त्यांनी मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या गुटखा तस्कर पोलिसांचे दिनमान खर्च अवाढव्य आहेत त्यामुळे हा पैशा येतो कोठून याचाही शोध घेणे गरजेचे आहे साधारण पोलीस खात्यात साधारणपणे एक पोलीस शिपाई यास 35 ते 40 हजार रुपये पगार असतो त्यात त्यांचा घरखर्च भरभाडे इंधन खर्च यासारखे इतर सर्व खर्च भागवून साधारणपणे कमीत कमी पगार शिल्लक राहत असेल पण श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाची साधारण पणे दरमहा खर्च तब्बल 50 हजाराच्या पुढे आहे.
त्यात त्यांची मौजमजा रंगीत संगीत पार्ट्या चारचाकी वाहनातून आठवड्याला पर्यटन स्थळाला भेट तसेच कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी घेतलेल्या विविध ठिकाणी जंगम मालमत्ता हे कश्यातन आले याचाही शोध घेण्याची गरज निर्माण झाली असताना माध्यम प्रतिनिधी यांनी याबाबत अधिक माहिती मिळवली असता पगार आणि घरची शेती पाहता उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसले त्यामुळे या सर्व गोष्टींचा खर्च पाहता काहीतरी गौडबंगाल असल्याचे स्पष्ट झाले . त्यावेळी काही गोष्टी व पोलीस ठाण्यात काम करण्याची पद्धत समोर आली असता असे कितीतरी खर्च सहज भागवू शकतात असे समजते राज्यात गुटखा बंदी असल्याने कर्नाटक येथून येणारा सर्व गुटखा तालुक्यातून सुरक्षित उतरून पुढे पाठवणी करणे हा त्या पोलिस शिपायाचा धंदा त्यामुळे काम खाजगी पण पगार सरकारी असाच काही प्रकार श्रीगोंदा कर्जत पोलीस ठाण्यात खुलेआम चालू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र याबाबत श्रीगोंदा पोलीस निरीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधीक्षक हे याबाबत कोणत्याही प्रतिक्रिया देण्याचे टाळत आहेत त्यामुळे सर्व काही राजेरोशपणे चालू आहे.

 

Related Posts
1 of 2,190
त्या पोलीस शिपायाची स्थावर जंगम मालमत्ता तपासा?
गुटखा तस्करीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करून त्यातून स्थावर आणि जंगम मालमत्ता मोठ्या प्रमाणात गोळा केल्याची खुलेआम चर्चा होताना दिसत आहे तरी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याकडे तक्रार केली असल्याचे एका नागरिकाने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले आहे.
अनेक संघटना गुटखा तस्करी करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात
श्रीगोंदा तालुक्यातील गुटखा विक्रीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे त्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सामील असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना अनेकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या त्या पोलीस कर्मचार्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड, सामाजिक कार्यकर्ते,भीम आर्मी अश्या अनेक संघटना उपोषण आंदोलने करण्याच्या तयारीत आहेत याची दखल प्रशासन घेणार का ? हे अवघ्या काही दिवसात जनतेसमोर येईलच.

 

 

तपास अधिकाऱ्यावर दबावतंत्र?
श्रीगोंदा काष्ठी रोडवर हॉटेल अनन्या जवळ गुटखा पकडल्या नंतर गुन्हा दाखल झाला त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभंग यांच्याकडे सोपविण्यात आला मात्र बोगस आरोपीच्या अटकेनंतर या गुन्ह्यात अजून कोणालाही अटक अथवा चौकशी कामी बोलविण्यात आलेले नाही त्यामुळे तपास अधिकारी यांच्यावर दबावतंत्र वापरण्यातयेत असल्याची जोरदार चर्चा आहे
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: