DNA मराठी

सिद्धार्थ ग्रुप च्या वतीने महामानवास अभिवादन

0 129
Greetings from Mahamanavas on behalf of Siddharth Group

  प्रतिनिधी DNA मराठी टीम 

अहमदनगर –  राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)131 व्या जयंती निम्मित नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे सिद्धार्थ ग्रुप (Siddhartha Group) च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संपतराव म्हस्के, सरपंच शहाजी आटोळे, उपसरपंच अविनाश पवार, ग्रा. प सदस्य हर्षल कांबळे, मोहन कांबळे, दिपक कांबळे, अमोल सोनवणे, प्रमोद कांबळे, प्रवीण ठोंबे, लक्ष्मण कांबळे , ग्रामस्थ आणि सिद्धार्थ ग्रुपचे सर्व मेम्बर उपस्थित होते.
Related Posts
1 of 2,493
 सिद्धार्थ ग्रुप टाकळी काझी च्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे वर्षीही वेगवेगळ्या उपक्रमाने सांस्कृतिक कार्यक्रम व गावात मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सिद्धार्थ ग्रुप, भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: