1 ली ते 7 वीच्या वर्ग सुरु करण्यासाठी सरकारकडून हिरवा कंदील

0 277

 नवी मुंबई –  मागच्या दोन वर्षापासून कोरोना विषाणू (Corona virus) च्या प्रभावामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळांना पुन्हा एकदा खुले (School Reopen) करण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे. सध्या राज्यात आठवी ते बारावपर्यंतच्या वर्ग ( classes) सुरू आहे. तर पहिली ते सातवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने होत आहे. (Green light from the government to start 1st to 7th classes)

मात्र आता पहिली ते सातवी प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी सरकारकडून हिरवा कंदील  मिळाला आहे. तर, राज्यातील 1 ली ते 7 वीच्या वर्ग सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची (Department of Health) कोणतीही अडचण नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि कॅबिनेटच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल. येत्या 10 दिवसात याबाबत निर्णय होईल, अस देखील राजेश टोपे  यांनी म्हटलं आहे. तसेच, आरोग्य विभागाची पहिली ते चौथी वर्ग सुरु करण्यास कोणती अडचण नसल्याचंही म्हटलं आहे.

1 ली ते 4 थी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन संसर्गित होणार नाहीत या पार्श्वभूमीवर त्यांना आपण शाळेमध्ये येऊन दिलं पाहिजे. 1 ली ते 4 थीचे वर्ग ( primary school reopen) सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन सुरु करण्यास परवानगी द्यावी यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सनं (Child Task Force) परवानगी द्यावी असं मत मांडलं आहे.(Green light from the government to start 1st to 7th classes)
Related Posts
1 of 1,481
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: