AIMIM ला मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणात अकबरुद्दीन ओवेसी यांची निर्दोष मुक्तता

0 235
Great relief to AIMIM; Akbaruddin Owaisi's acquittal in 'that' case

हैदराबाद –  एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचे बंधू आणि तेलंगणामधील चंद्रयानगुट्टाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांची दोन द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बुधवारी (१३ एप्रिल) रोजी हैदराबादमधील विशेष न्यायालयाने  हा निकाल दिला आहे. या निकालामुळे AIMIM ला मोठा दिलासा मिळाला आहे. अकबरुद्दीन ओवेसी सध्या AIMIM चे तेलंगणा विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत.

अकबरुद्दीन ओवेसी यांनी 8 डिसेंबर 2012 आणि 22 डिसेंबर 2012 रोजी निजामाबाद आणि निर्मल शहरात त्यांनी दिलेल्या कथित द्वेषपूर्ण भाषणामुळे ते संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले होते. (Great relief to AIMIM; Akbaruddin Owaisi‘s acquittal in ‘that’ case)

Related Posts
1 of 2,358

 

2012 मध्ये त्यांनी निर्मल शहरात “15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवा, आम्ही 100 कोटी हिंदूंना संपवू” असे वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या भाषणामुळे त्यांना ३० दिवस तुरुंगात देखील राहावे लागले होते. निजामाबाद प्रकरणात 41 साक्षीदार तपासण्यात आले, तर निर्मल प्रकरणात 33 साक्षीदार तपासण्यात आले. (Great relief to AIMIM; Akbaruddin Owaisi’s acquittal in ‘that’ case)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: