DNA मराठी

राम मंदीराच्या उभारणीचे काम पाहून कृतकृत्य झालो – राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोध्येत जावून प्रभू श्रीरामांचे दर्शन आणि महाआरतीला उपस्थित

0 8
Radhakrishna Vikhe

आयोध्या –  प्रतिनिधी

रामल्लाचे दर्शन आणि ऐतिहासिक आशा राम मंदीराच्या उभारणीचे काम पाहून कृतकृत्य झालो असल्याची प्रतिक्रिया महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोध्येतून व्यक्त केली.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोध्येत जावून प्रभू श्रीरामांचे दर्शन आणि महाआरतीला उपस्थित होते.

आयोध्येत राम मंदीराच्या सुरू असलेल्या कामाची पाहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत पाहाणी केली.मंदीर निर्माणातील कारागीर,स्थानिक नागरीक तसेच सुरक्षा रक्षकांशी मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधून या सर्व कामातील बारकावे जाणून घेतले.

Related Posts
1 of 2,528

लोकप्रतिनिधी भेटत नसल्याने जनतेचे प्रश्न प्रलंबित…

यासर्व पाहाणीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की आयोध्येत सर्वाच्या बरोबरीने झालेले प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन आणि अनेक वर्षाची प्रतिक्षा असलेले राम मंदीर उभे राहात असल्याची पाहणी करता आली यामुळे आपण कृतकृत्य असल्याचे त्यांनी सांगितले.

आयोध्येत राम मंदीर व्हावे ही कोट्यावधी रामभक्तांची इच्छा होती.पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंदीर निर्माणाचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आणि समाधान असल्याचे सांगून मंत्री विखे म्हणाले की मंदीराचे काम अतिशय आखीव रेखीव पध्दतीने होत आहे प्रत्येक खांबावरील नक्षीकाम अतिशय सुबक आणि लक्ष वेधून घेणारे असल्याने प्रभू श्रीरामाचे मंदीर हे भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतिक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: