किरकोळ कारणातून ग्रामसेवकाला मारहाण; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

0 302
Businessman beaten with bat and stump in minor dispute in the city; Filed a crime

अहमदनगर – किरकोळ कारणातून ग्रामसेवकाला (Gramsevak) लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना सावेडी उपनगरात घडली. बाळासाहेब नाना आतकर (वय ५७ रा. सावेडी, अहमदनगर) असे मारहाण झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल भीमराज वरखेडकर, वैशाली अमोल वरखेडकर आणि हर्ष अमोल वरखेडकर (तिघे रा. सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

Related Posts
1 of 2,427

अमोल वरखेडकर याने फिर्यादी आतकर यांचा मुलगा प्रसाद याला विनाकरण थांबवून, ‘माझ्याकडे काय पाहतो, निट पाहायचे नाही तर खूप मारीन’, असे म्हणून दम दिला. याबाबत फिर्यादी आतकर यांनी अमोल वरखेडकर याला जाब विचारला. त्याचा राग आल्याने अमोलने आतकर यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच अमोल याची पत्नी वैशाली, मुलगा हर्ष यांनी आतकर व त्यांचा मुलगा प्रसाद यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: