DNA मराठी

Anti-corruption : लाचघेताना ग्रामसेवक रंगेहाथ पकडला…

तक्रारदारांकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारली

0 10
anti-corruption DNA MARATHI

लाचघेताना ग्रामसेवक रंगेहाथ पकडला…
नाशिक : गावठाण मधील इमारतीची नोंद करून व इमारतीची ग्रामपंचायत प्रमाणे घराची घरपट्टी ठरवून देण्याचे मोबदतल्यात पन्नास हजारांच्या लाचेची मागणी करून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाथरे येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

Nilesh Lanka:- नीलेश लंके सकाळी सव्वा सहालाच बांधावर

नितीन सगाजी मेहेरखांब (42, रा. त्रिमूर्ती चौक, संगमनेर, जि. अहमदनगर) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्यांचे पाथरे, खुर्द (ता. सिन्नर) येथे गावठाण हद्दीत जुने घर आहे. त्यांनी सदर घराचा काही भाग व ओटा तोडून दोन मजली इमारत बांधले. सदर गावठाणमधील इमारतीची नोंद करून व इमारतीची ग्रामपंचायतप्रमाणे घराची घरपट्टी ठरवून देण्याचे मोबदल्यात लाचखोर ग्रामसेवक मेहेरखांब याने तक्रारदारांकडे (ता 12) पन्नास हजाराच्या लाचेची मागणी केली होती.

Related Posts
1 of 2,494

तकारदार यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पथकाने शहानिशा केल्यानंतर सापळा रचला. लाचेचा पहिला हप्ता 25 हजार रुपये देण्याचे बुधवारी रात्री ठरले त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील एका हॉटेलमध्ये संशयित लाचखोर मेहेरखांब याने तक्रारदारांकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यावेळी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मेहेरखाम यास रंगेहात अटक केली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक साधना इंगळे , सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: