ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायत सदस्यांचे पंचायत समिती समोर आमरण उपोषण

0 24

श्रीगोंदा :-  श्रीगोंदा तालुक्यातील वेळू ग्रामपंचायत च्या ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सरपंच विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य पंचायत समितीच्या प्रांगणात आमरण उपोषणाला बसले आहेत. (Gram Panchayat members go on a hunger strike in front of the Panchayat Samiti)

श्रीगोंदा तालुक्यातील वेळू येथील ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेविका अश्विनी व्यव्हारे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून व त्यांच्या कामकाजास विरोध करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य पंचायत समितीच्या प्रांगणात आमरण उपोषणाला बसले आहेत त्यामध्ये त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दि  ०१ जानेेवारी २०२१ ते दि. १० जून पर्यच्या प्रोसिडींग,कॅशबुक व अजेंठा रजिस्टर च्या सर्व नकला साक्षांकित प्रतीत मागितल्या होत्या. परंतु त्या दिलेल्या नाहीत.
तसेच माहे एप्रिल २०२१ मध्ये मासिक सभा झालेली नसतानाही सरपंच उपसरपंच व दोन सदश्यांच्या अजेंठा रजिस्टरवर सहया घेउन बेकायदेशीर मिटींग दाखविण्याच्या प्रयत्न केलेला आहे, परंतु इतर तीन सदश्यांना मिटींग बाबत कोणतीही कल्पना किंवा अजेंठा दिलेला नव्हता . त्यामुळे सदरचा काढलेला अजेंठा हा बेकायदेशीर ठरविण्यात यावा. तसेच ग्रामसेवक आठवडयातुन केवळ एकच दिवस कार्यालयात उपस्थित राहतात.
Related Posts
1 of 1,301
दररोज कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहत नाहीत.तसेच आम्ही तीन ग्रामपंचायत सदश्यांनी मासिक सभेमध्ये सुचविलेले ठराव मासिक सभा प्रोसिडींग ला घेतले जात नाहीत.सरपंच पती व उपसरपंच पती ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करतात परंतु शासन निर्णयाप्रमाणे त्यांना कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, ही बाब ग्रामसेवकांना माहीत असतानाही व आम्ही त्यांच्या निदर्शनास आनुन दिली असतानाही ग्रामसेवक सरपंच पती व उपसरपंच पती यांचे समर्थ करत आहेत.
तरी ग्रामसेवकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी व जोपर्यत ग्रामसेवकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणापासुन परावृत्त होणार नाहीत असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य सतिष देबरे,माने निकिता सचिन,पिंपळे नूतन शिवाजी,मनीषा शिवाजी पिंपळे या ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह्या आहेत. (Gram Panchayat members go on a hunger strike in front of the Panchayat Samiti)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: