सरकारने ३० रू किलो दराने कांदा खरेदी करावा – राज्य कांदाउत्पादक संघटना

0 100

श्रीगोंदा :-  मागील काही दिवसांपासून सातत्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने महाराष्ट्रातील कांदा (Onion) उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून सध्या कांद्याला जो दर मिळत आहे त्यामध्ये उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे साठवणूक केलेल्या कांद्यामध्ये सड होण्याचे व वजन घटण्याचे प्रमाण जास्त आहे त्यातच आता कांद्याचे दर 12-15 रूपये प्रति किलो इतके खाली आल्याने   राज्यभरातील कांदा उत्पादकांमध्ये मोठी संतापाची भावना असून महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या मदतीने संयुक्तरित्या थेट शेतकऱ्यांचा कांदा 30 रुपये प्रति किलो या दराने सरसकट खरेदी करून हा कांदा परराज्यात व परदेशात पाठवावा व कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा ही विनंती.

 अन्यथा कांदा संघटनेकडून राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी. अशा ईशारा राज्य कांदाउत्पादक संघटनेकडून देण्यात आला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना 30/8/2021 पासुन  निवेदने देण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून आज दि. 3/9/2021 रोजी श्रीगोंदा येथेही तहशीलदार यांना निवेदन देण्यात आले .
दरम्यान शेतकर्यांची देशातिल पहिली संघटना स्थापन करणारे शेतकरी नेते स्व. शरदजी जोशी साहेबांच्या जयंती चे औचित्य साधुन शेतकरी संघटनेकडून ही कांदाउत्पादक संघटनेच्या मागण्यास पाठींबा दर्शवणारे निवेदन तहशीलदार यांना देण्यात आले शेतकरी संघटनेच्या निवेदनामधे भविष्यातिल कांद्याचे विक्री व्यवस्थापना सोबत शेतकर्यांचा कांदा पिकाकडे वाढता कल पाहता लागवडीच्या क्षेत्रात होत असलेली वाढ व त्या मुळे होणारे अतिरिक्त उत्पन्नाची विक्री व्यवस्था शासनाने वेळीच प्रसंगावधान राखुन कराव्यात जेणेकरून भविष्यात शेतकर्यांच्या मालाची योग्य किंमत त्याला मिळेल अशा आशयाच्या सूचना निवेदनामधे करण्यात आल्या आहेत.
यावेळी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे श्रीगोंदा युवा तालुकाध्यक्ष गणेश सुंबे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पोपट झगडे कांदा उत्पादक राजकुमार पंधरकर ,किरण दरेकर ,दिनेश ओव्होळ,संतोष गायकवाड ,विजय शेंडगे,दत्तात्रय पोटे आदी उपस्थित होते.
Related Posts
1 of 1,481
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: