DNA मराठी

दूध भेसळीबाबत सरकार गंभीर :- राधाकृष्ण विखे

दूध भेसळ याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत त्यावर आम्ही कडक कारवाई देखील केली

0 219

शिर्डी : दूध भेसळीच्या प्रकार हे मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. या बाबत शासनाने गांभीर्याने याची दखल घेतली आहे. असे भेसळीचे प्रकार कुठ आढळून आले तर तात्काळ टोल फ्री नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी केले.

शिर्डी येथे महापशुधन एक्स्पो या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार,  ( abdul-sattar) खासदार डॉ. सुजय विखे  (Dr.Sujay Vikhe ) पाटील, डीसीसी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कुलगुरू शरद गडाख, जिल्हाधिकारी सिध्यराम सालिमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, भाजपचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांची उपस्थिती होते.

सत्तेच्या नशेत नेत्यांकडून गैर कृत्यांचे प्रकार वाढ, राजकारणात डागाळलेली नेते, तरीही मी तो नव्हेच.

विखे म्हणाले की, महापशुधन एक्स्पो च्या माध्यमातून शेतकऱ्यास तसेच पशुपालक यांना नवनवीन तंत्रज्ञान तसेच कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळविता येते या बाबत माहिती मिळते, शिवाय विविध प्रजातीचे पशू पक्षी यांचे संगोपन कशा पद्धतीने करावे या बाबत ज्ञान मिळते. जेणकरून होणारे नुकसान टाळून शेती पूरक व्यवसाय यशस्वी करता येईल.

 

Related Posts
1 of 687

राज्यात आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही सातत्याने दूध भेसळ याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत त्यावर आम्ही कडक कारवाई देखील केली आहे, अजूनही कुठे असे प्रकार होत असतील तर याबाबत टोल फ्री नंबर वर तात्काळ तक्रार करावी आम्ही लगेच कारवाई करू असे त्यांनी सांगितले. पशूंच्या देशी वाणाचे संवर्धन करण्यासाठी आमचा विभाग सातत्याने प्रयत्नशील असून या करिता अधिकारी तसेच तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन देखील आम्ही घेत आहोत, याकरिता अशा महएक्सपोची मदत होते असे ते म्हणाले.

 

अनिल जयसिंगानी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध काय?
अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणातून विखे पाटील यांच्या कडे सर्वांची लगाम आहे त्यामुळं नगर जिल्ह्यात सर्व काही ठीक सुरू आहे. मागील सरकार मध्ये राज्यमंत्री असताना विखे यांच्या सोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे तत्कालीन मुख्यमंत्र्याना पटत नव्हते, मला वेळोवेळी त्या बाबत टोकत होते. मात्र आमची मैत्री ही कायम ठेवली असे सांगून अशा सगळ्या गोष्टी एकत्र येवून राज्यात सत्तांतर झाले. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही शेतकरी, पशुपालक तसेच सर्वांसाठी महत्वाचे निर्णय घेतले, आता गारपीट झाली असून पंचनामे झाले आहेत मदतीची घोषणा करून एक महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे यावेळी सत्तार यांनी सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: