तालुक्यातील ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनेत सरकारी उदासीनता

0 14

श्रीगोंदा ;-  श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण पाणी समस्या दूर करण्यासाठी आपल गाव आपल पाणी तसेच ग्रामीण पेय जल योजना या अनेक योजनाखाली श्रीगोंदा तालुक्यात अनेक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या पण त्यातील ९० टक्के पाणीपुवठा योजना गावकीच्या राजकारणात आणि सरकारी लाल फितीत अडकल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील रहिवाश्यांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

श्रीगोंदा तालुक्यामध्ये काही गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबवली गेली असली तरी काही गावे अद्याप तहानलेली आहेत. गाव पाणीपुरवठा योजनेसाठी लाखो लिटर पाणी प्रस्थापि करण्यात आले आहे. योजनेसाठी सुमारे १२८ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता .

या योजनेसाठी सर्व ग्रामपंचायतिनी हिरवा कंदील दाखवला होता. मात्र त्यानंतर या योजनेचे प्रस्ताव तयार करूनही ते धूळ खात पडलेले आहेत. तर काही गावात राजकीय वादातून अनेक योजना अपूर्ण आहेत त्यामुळे फेब्रुवारीनंतर पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते.

Related Posts
1 of 1,301

या ठिकाणी सुमारे ४० ते ५० हजार लोकसंख्येला ८० ते ९० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मार्च ते जून पाऊस पडेपर्यंत पाण्याची ही समस्या कायम असते. त्यामुळे ही योजना शासनदरबारी ठेवून प्रशासकीय मान्यतेनंतर ती कार्यान्वित करावी यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नळपाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी झाल्यास तालुक्याचा पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे, असे येथे म्हटले जाते.

अनेक योजनचे दप्तर गायब?
श्रीगोंदा तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजनेचे सर्व दप्तर गायब झाले आहे ते अहमदनगर जिल्हा परिषदेतही तसेच श्रीगोंदा पंचायत समिती मध्येही या योजनेचे ठेकेदार कोण कामावर देखरेख करणारे अधिकारी अधिकारी कोण ? याचा कुठलाही थांगपत्ता लागत नाही असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: