शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच सरकारने लागू केले कृषी कायदे – राष्ट्रपती रामनाथ गोविंद

0 14

नवी दिल्ली –   संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज दि २९ जानेवारी पासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरूवात झाली. या अभिभाषणात राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी सरकारने केलेल्या कामबद्दल संसदेला माहिती दिली . तर आपल्या या अभिभाषणात रामनाथ गोविंद यांनी दिल्लीच्या सीमेवर मागच्या दोन महिन्यापासून केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाचा आणि देशाच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या हिंसाचा उल्लेख केला आहे.

 अजित पवारचं भेसळ करतोय, अशी माझी बदनामी व्हायची

तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर  राष्ट्रपतींनी म्हणाले कि  सखोल चर्चेनंतर संसदेत सात महिन्यांपूर्वी तीन कृषी कायदे करण्यात आले. या कृषी सुधारणांचा फायदा १० कोटी पेक्षा जास्त छोट्या शेतकऱ्यांना तात्काळ मिळणं सुरू झालं आहे. छोट्या शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिला होता  असं राष्ट्रपती म्हणाले.

आपल्या या अभिभाषणात राष्ट्रपती रामनाथ गोविंद या तिन्ही कायद्यांबद्दल बोलताना पुढे म्हणाले कि सध्या या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा सन्मान करून त्याचं पालन करेल. कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार प्रत्येक आंदोलनाच आदर करते. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना दुर्दैवी आहे. जे संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते. तेच संविधान आपल्याला कायदा आणि नियमांचं गंभीरपणे पालन केलं पाहिजे  असं राष्ट्रपती म्हणाले.

Related Posts
1 of 1,291

फोटो दिला नाही तर तुझी बदनामी करणार अशी धमकी देणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी केली अटक

नवीन कृषी कायद्यांची अंमलबजाणी करण्यापूर्वी जी व्यवस्था अस्तित्वात होती. जे अधिकार व सुविधा होत्या, त्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. उलट या कृषी सुधारणा कायद्यांच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अधिकारही दिले आहेत. कृषी क्षेत्राला अधिक लाभ देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधांवर काम करत आहे असं राष्ट्रपतींनी अभिभाषणातून स्पष्ट केलं.

सदस्य अज्ञातस्थळी रवाना , तालुक्यातील ५८ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: