Good News: ‘या’ दिवशी राज्यात मान्सून करणार एन्ट्री; जाणुन घ्या संपूर्ण डिटेल्स

मुंबई – राज्याचा संपूर्ण देशात मागच्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होताना दिसून येत आहे काही ठिकाणी उष्णतेची लाट असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.
यातच आता भारतीय हवामान विभागाने (IMD) येत्या 48 ते 72 तासांमध्ये मान्सून (Monsoon) केरळमध्ये एन्ट्री करणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. याच बरोबर राज्यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रात 30 मे रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर राज्यात 7 ते 10 जूनच्या दरम्यान मान्सूनचा आगमन होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.