Good news – केंद्र सरकार देणार 12 कोटी लोकांना “इतकी” रक्कम..

0

नवी दिल्ली –  देशात सुरू असलेल्या कोरोनाविषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती अगदी बिकट झाली आहे.

अशातच केंद्र सरकारकडून देशातील तब्बल बारा कोटी लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी आली. पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2021मध्ये देशातील शेतकऱ्यांच्या पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचा 9 वा हप्ता जमा करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.

 पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांच्या ( Farmers) बँक खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जात आहे. सहा हजार रूपयांची ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये अशी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा   केली जात आहे. सर्व पात्र शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळावा याची काळजी घ्यावी, असे केंद्र सरकारने राज्यांना बजावले आहे.

या योजनेमागे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांचे 8 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता हा नववा हप्ता असणार आहे. सुमारे 12 कोटी नोंदणीकृत शेतकर्‍यांना या हप्त्याचा लाभ देखील मिळेल.

Related Posts
1 of 1,153

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे. यासाठी प्रथम www.pmkisan.gov.in लॉगीन करावी लागेल. वेबसाइटच्या पहिल्या पानावर, फार्मर्स कॉर्नर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे. आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादीवर (Beneficiary list) क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकता

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: