Gold- Silver Price Today: Gold becomes expensive again; Find out today's quote Gold- Silver Price Today: Gold becomes expensive again; Find out today's quote

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

मुंबई –   १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किमतींमध्ये (Gold Rate) आज देखील घसरण सुरूच आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. आज १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७ हजार ६४० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये सोन्याची किंमत ४७ हजार ७५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. तर दुसरीकडे चांदी (Silver Rate) ६७ हजार ४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जाणून घ्या आजचा काय आहे भाव?

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७ हजार ६४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१ हजार ९७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७ हजार ६९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२ हजार ०२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७ हजार ६९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२ हजार ०२० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६७४ रुपये आहे.

घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर

सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता. (Gold-Silver Rate: Gold-Silver Rates Continue to Fall; Find out today’s rate)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *