Gold- Silver Price Today: सोन्याच्या किंमतीत वाढ ! जाणून घ्या नवीन दर

मुंबई – आज बाजारात १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७ हजार २१० आहे. हीच किंमत काल ४७ हजार २०० रुपये इतकी होती. तर दुसरीकडे आज बाजारात चांदी ५८ हजार ७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. (Gold- Silver Price Today: Gold price rises! Learn new rates)
काय आहे आजचा भाव?
मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,२१० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,५०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,६०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,६०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,३१० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,६०० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५८७ रुपये आहे.
घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर
सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता. (Gold- Silver Price Today: Gold price rises! Learn new rates)