Gold-Silver Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ; जाणून घ्या आजचा भाव

0 239
Gold-Silver Price Today: Gold price rises; Find out today's quote
 
मुंबई –   रुपयाच्या घसरणीमध्ये होत असलेल्या सुधारणामुळे आज देखील भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या (Gold and silver) किमतींमध्ये वाढ झाली आहे. भारतीय बाजारात आज १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७ हजार ५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६ हजार ७०० रुपये इतकी होती. तर आज चांदी ६१ हजार ४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

काय आहे आजचा भाव?

Related Posts
1 of 2,427

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,०५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,३३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,१५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,३८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,१५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,३८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,१५० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,३८० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१४ रुपये आहे.

 

 

घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर

सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: