Gold- Silver Price: सोने – चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा दर

प्रतिनिधी – DNA मराठी टीम
मुंबई – मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेन युध्दामुळे (Russia and Ukraine War) आता भारतीय अर्थव्यवस्थेवर (Indian economy) देखील परिणाम होत आहे. यातच आता भारतीय सराफ बाजारात (Indian Gold Market) सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मागील व्यवहाराच्या दिवसाच्या तुलनेत आज सोन्या (Gold Price Today) चांदीच्या (Silver Price Today) किमतींमध्ये वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव 232 रुपयांनी वाढला आहे तर दुसरीकडे चांदीच्या दरात 254 रुपयांची वाढ झाली. (Gold-Silver Price: Gold-Silver Price Rise; Find out today’s rate)
जाणून घ्या आज सोन्याचा भाव
दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 232 रुपयांनी वाढून 51,816 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 51,584 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
आज चांदीची किंमत
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 254 रुपयांनी वाढून 68,312 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 68,058 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर
सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.