DNA मराठी

Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा भाव

0 362
Gold-Silver Price Today: Gold price rises; Find out today's quote

 

मुंबई –   संपूर्ण देशात सध्या लग्नसराईचा सीजन सुरु आहे. यातच मागच्या आठवड्यापर्यंत सोन्याच्या दरात घसरण सुरु होती मात्र आता  सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price) दरात वाढ झाली आहे. यामुळे अनेक कुटुंबाचे बजेट बिघडणार आहे. आजही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज सोन्याचा भाव 51 हजारांच्या वर तर चांदीचा भाव 62 हजारांच्या वर गेला आहे.

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोमवारी सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 7 रुपयांनी किरकोळ वाढून 51,350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. यापूर्वी सोन्याचा व्यवहार 51,259 रुपयांपासून सुरू होता, परंतु खरेदी आणि मागणी वाढल्याने लवकरच सोन्याची फ्युचर्स किंमत 0.01 टक्क्यांनी वाढून 51,350 रुपयांवर पोहोचली. गेल्या सलग सत्रात सोन्याच्या दरात घसरण झाली होती.

चांदीच्या दरातही वाढ

Related Posts
1 of 2,489

तर दुसरीकडे चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज तेजी दिसून येत आहे. एमसीएक्सवर आज सकाळच्या व्यवहारात चांदीचा भाव 52 रुपयांनी वाढून 62,600 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 62,450 रुपयांवर सुरू होता, परंतु मागणी आणि खरेदी वाढल्याने लवकरच त्याची किंमत 0.08 टक्क्यांनी वाढून 62,600 वर पोहोचली. 

 

 

डॉलरच्या कमजोरीमुळे सोने मजबूत

यूएस फेड रिझर्व्हने आपल्या व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली, त्यामुळे जागतिक बाजारात डॉलर कमकुवत होऊ लागला आणि सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. फेड रिझर्व्हचे प्रमुख यांनी सांगितले आहे की व्याज 0.75 टक्क्यांनी वाढण्याची देखील शक्यता आहे. यापूर्वी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. 18 एप्रिलपासून सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 2,500 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदी 8,800 रुपयांनी घसरली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: