सोने तारण फायनान्स कंपनीने न विचारता बेकायदेशीर लिलाव केल्याच्या निषेधार्थ कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर – दिल्लीगेट येथील मन्नपुरम फायनान्स लिमिटेड शाखेमध्ये विशाल भाऊसाहेब बेरड यांना पैशाची गरज भासल्याने फायनान्स कंपनी कडे अंगुठी गहाण ठेवून मन्नपुरम फायनान्स कडून रू 16500, 20 ऑक्टोंबर 2021 रोजी ठेव घेतली त्यानंतर 24 एप्रिल 2022 रोजी फायनान्स कंपनीकडे पैसे भरण्यासाठी गेले असता फायनान्सच्या कर्मचारी यांनी सांगितले की तुमचे सोनेतारनाचा लिलाव केल्याचे सांगितले.
फायनान्स कंपनी यांनी आरबीआयचे निर्देश न पाळता वरील सोनेतारण चे लिलाव केले आहे. सोने तारण करणाऱ्या व्यक्तीला फोनद्वारे किंवा नोटीस पाठवण्यात येते असे न करता परस्पर मन्नपुरम फायनान्स कंपनीचे अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर लिलाव केला त्याच्या निषेधार्थ फायनान्स कंपनीत जाऊन तेथील मॅनेजर यांना विचार पुस करण्याताली व यमागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच सेंट्रल बँक व्यवस्थापक अहमदनगर येथे देण्यात आले व परस्पर लिलाव करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी छावा प्रदेश संघटक अशोकराव चव्हाण पाटील, छावा महिला जिल्हाअध्यक्ष सुरेखाताई सांगळे, छावा पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी सचिव दत्ता वामन, रावसाहेब काळे, एकता संघटनेचे प्रदेश सचिव विलास तोडमल, रमेश बोठे, संगीता बेरड, मनोज गोयल, अक्षय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.