वाळूतस्करांची लोकेशन देतो तसेच बातम्या छापतो म्हणून पत्रकाराला जबर मारहाण

0 488
श्रीगोंदा –  श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील प्रमोद बाळासाहेब आहेर या पत्रकाराला परिसरातील वाळू तस्करांकडून वाळूचे लोकेशन देतो तसेच वाळू बाबत बातम्या छापतो त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात त्रास होतो म्हणून परिसरातील वाळूतस्करांनी पत्रकार आहेर यास लाठ्या काठ्यांनी मारहाण करत बियरच्या बाटल्या डोक्यात फोडून जबर जखमी केल्याची घटना घडली आहे याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील प्रमोद बाळासाहेब आहेर या पत्रकारास दिनांक 7 सप्टेंबर रोजी वाळू तस्करांकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते की आमचे लोकेशन फोटो पोलिसांना देतो तसेच वाळू बाबत वर्तमानपत्रातून मोठ्या प्रमाणात बातम्या प्रसिद्ध करतो असे म्हणून फिर्यादी प्रमोद आहेर यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत बिअरच बाटल्या ने हातापायावर जबर मारहाण करत त्यातील दोन अनोळखी इसमाने बियरच्या बाटल्या डोक्यात फोडून दोन रिवाल्वर डोक्यात लावली आणि पत्रकार यास म्हणाले की परत लोकेशन पोलिसांना दिल्यास ठार मारण्याची धमकी देत रिवाल्वर डोक्यात लावला होता.
Related Posts
1 of 1,608
त्यावेळी आरोपींकडून पत्रकार आहेर यांस म्हटले म्हटले की तू आम्हाला एक लाख रुपये दे असे म्हणत त्याच्या जवळील सात हजार रुपये त्यांनी बळजबरीने काढून घेतले व त्या ठिकाणाहून पळ काढला याप्रकरणी पत्रकार प्रमोद आहेर यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात भादवि 395, 384 आर्मी ऍक्ट कलम 3 तसेच महाराष्ट्र प्रसारमाध्यम आधिनियम कायदा कलम दोन पब्लिक 4 नुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश बोराडे ही करत आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: