मला वनमंत्री पद द्या शिवसेनेच्या या नेत्याने केली उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी 

0 14

नवी मुंबई –  २२ वर्षीय पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातून चर्चेत आलेल्या शिवसेना नेते संजय राठोड यांना भारतीय जनता पक्षाने पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप करत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यवा लागला .  यामुळे राज्याचा नवीन वनमंत्री कोण होणार याची याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

याच दरम्यान शिवसेनेचे नेते हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून संजय राठोड यांच्याजागी मला वनमंत्री पद द्या अशी मागणी करणारे दोन पत्र लिहिली असून त्यांनी भेटीसाठी सुध्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याजवळ वेळ मागितला आहे.

हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना ७ मार्च रोजी पहिलं तर दुसरं पत्र ११ मार्चला पाठवलं आहे. या पत्रांमध्ये हरीभाऊंनी शिवसेनेला बंजारा समाजाची गरज असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी दहा मिनिटांचा वेळ मागितला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या वनमंत्री पदी बंजारा समाजाचे नेते म्हणून आपल्याला संधी द्यावी अशी मागणी या पत्रामध्ये हरीभाऊंनी मुख्यमंत्र्यांकडे की आहे.

सुधीरभाऊंचे असे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील – संजय राऊत

Related Posts
1 of 1,322

आपल्या पात्रात त्यांनी  तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. त्यामुळे आता वनमंत्रीपद मला द्यावे  असं  म्हटलं आहे. शिवसेनेमध्ये बिनशर्त प्रवेश केल्याची आठवण करुन देत, सत्तेत आल्यास खारीचा वाटा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचंही हरीभाऊ यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

शारीरिक संबंधासाठी बांधले खुर्चीला हात त्यानंतर पत्नीने चाकूने कापला गळा 

कोण आहेत हरीभाऊ राठोड

हरीभाऊ राठोड यांच्याकडे बंजारा समाजातील विदर्भातील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून पाहिलं जातं. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी विदर्भामध्ये शिवसेनेचा जोरदार प्रचार केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या भागामध्ये लहान मोठ्या १४ प्रचार सभांचे आयोजन करण्यात आलं होतं.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: