गायी म्हशीसह जनावरे तेलंगणाच्या कारखान्यात नेणारी टोळी जेरबंद

0 10

गडचिरोली –  गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत जिल्ह्यात अल्प किंमतीमध्ये शेतकऱ्यांकडून गायी म्हशीसह जनावरे खरेदी करुन तेलंगणाच्या कत्तलखाण्यात कत्तलीसाठी नेणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे.  या अटक केलेल्या आरोपीकडून 1 कोटी 15 लाख 68 हजार रुपयांचा ऐवज  गडचिरोली पोलिसांनी  जप्त केला आहे.

श्रीगोंदयात 87 तर काष्ठी मध्ये विनामास्क 112 जणांवर कारवाई

याप्रकरणात मिळालेली माहिती अशी कि आरमोरी तालुक्यात ठाणेगाव मार्गावर ही वाहने पोलिसांनी थांबवून  तपासणी केली. या तपासणीत पाच ट्रकमधून  141 गायी म्हशी आणि रेडे सापडले.  या जनावरांची किंमत 17 लाख 55 हजार रुपये असून  या आरोपींची तपासणी केल्यानंतर 1 लाख 13 हजार रुपयांची 10 मोबाईलही जप्त केली आहेत. जप्त केलेल्या वाहनांची किंमत 97 लाख रुपये आहे. एकूण 1 कोटी 15 लाख 68 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

या कारणाने पूजा चव्हाणचा मृत्यू ,पोस्टमॉर्टेम रिपोर्ट मध्ये शिक्कामोर्तब 

Related Posts
1 of 1,301

अटक केलेले आरोपी बहुतांश हे तेलंगणातले आहेत तर नागपूर आणि मध्यप्रदेश येथील ही काही आरोपी आहेत. ही जनावरे कत्तलीसाठी थेट हैदराबादला नेली  जात असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे.

डॉक्टरने एकतर्फी प्रेमात घातला बुरखा आणि मग …

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: