शहरात दरोडा टाकुन पसार झालेल्या दरोडेखोरांची टोळीला कोतवाली पोलीसांकडुन २४ तासांचे आत अटक

0 16

अहमदनगर –   अहमदनगर शहरात दरोडा टाकुन पसार झालेल्या दरोडेखोरांची टोळीला कोतवाली पोलिसांनी चोवीस तासात अटक करण्यात आली आहे .

या घटने बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि  दि २३ जानेवारी २०२१ रोजी फिर्यादी दत्तात्रय खंडु हापसे वय ३२ वर्ष रा टाकळी मिया ता राहुरी जि अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, मी दि २२/०२/२०२१ रोजी रात्री ०८/०० वा सुमारास माळीवाडा अहमदनगर येथुन राहुरी येथे जाण्या करिता पैसेंजर म्हणुन माझ्या गाडीत बसलेल्या पाच अनोळखी पुरुषांनी रात्री ०९. ०० वा ते ११. ४५ वा च्या दरम्यान नांदगाव फाटा ता अ नगर येथे उलटी आल्याचे कारणा वरुन गाडी थांबण्यास सांगुन माझ्या डोळ्यात तिखट टाकुन माझ्या गळ्याला टोकदार वस्तु लावुन मला पाठीमागील सिटचे मध्ये दाबुन धरुन येथे घेवुन जावुन माझे एटीएम व क्रेडीट कार्ड हिसकावुन घेवुन व त्याचा पासवर्ड बळजबरिने विचारुन माझी मारुती सियाझ कंपनीची फोरव्हीलर गाडी घेवुन पळुन गेले आहेत.

कोण होणार विधानसभा अध्यक्ष? ,निवडणुकीबाबत हालचालींना वेग

दत्तात्रय खंडु हापसे फिर्याद वरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक श्री.राकेश मानगावकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे पुणे चाकण परिसरात सदर गाडीची विल्हेवाट लावण्या करिता थांबलेले आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकासह चाकण पुणे येथे जावुन सापळा लावुन तांत्रीक विश्लेषन करुन सदर संशयीत इसमास ताब्यात घेवुन त्यांचे कडे विचारपुस करता त्यानी प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यानी त्यांचे नाव १) बाबासाहेब उर्फ बाबु बाळु शिंदे वय २० वर्ष रा दहीवंडी ता शिरुरकासार जि बिड २) विश्वजित सिध्देश्वर पवार वय २० वर्ष रा गोमलवाडा ता शिरुर कासार जि बिड ३) रमेश कचरु आघाव वय २० वर्ष रा दहीवंडे ता शिरुर कासार जि बीड असे सांगीतले तसेच त्यांचे आणखी दोन साथीदार हे शिरुर कासार बिड येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने ४) योगेश संजय आघाव वय १९ वर्ष रा दहीवंडी ता शिरुर कासार जि बिड यास शिरुर कासार बिड मधुन ताब्यात घेतले असुन त्यांचा एक साथीदार फरार झालेला आहे, त्यांनी गुन्ह्यातील बळजबरिने हिसकावुन घेवुन गेलेली फोरव्हीलर कार व क्रेडीट कार्ड असा मुददेमाल त्यांचे कडुन हस्तगत केलेला आहे, पुढील तपास सपोनि विवेक पवार हे करीत आहेत.

Related Posts
1 of 1,290

त्यामुळे संजय राठोड प्रकरणावर उद्धव ठाकरे शरद पवारंच ऐकतील – नारायण राणे 

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. सौरभ अग्रवाल सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल शरद ढुमे सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर सो, व गुन्हे शोध पथकाचे सपोनि विवेक पवार, पोना गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे , पोना रविंद्र टकले, पोना विष्णु भागवत, पोना नितीन शिंदे, पोना शाहीद शेख, पोकॉ
सुमित गवळी, पोकाँ सुशिल वाघेला, पोकाँ योगेश कवाष्टे, पोकाँ भारत इंगळे, पोकॉ कैलास शिरसाठ, पोकाँ तान्हाजी पवार, पोकाँ प्रमोद लहारे, पोकाँ सोमनाथ राउत, पोकाँ सुजय हिवाळे व मोबाईल सेलचे पोकाँ नितीन शिंदे, पोकाँ प्रशांत राठोड यांनी सदरची कारवाई केली आहे.

एकाच शाळेत शिकणाऱ्या 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: