बायकोसोबत भांडण झाल्याने जुगारी बापाने केला मुलीचा खून

0 241

 नवी मुंबई –   पत्नीसोबत भांडण झाल्याने जुगारी बापाने (Gambling father) सात वर्षाच्या मुलीची हत्या (Kill) केल्याची धक्कादायक घटना ठाण्याच्या मुंब्रा भागात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर  जुगारी बापाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या आरोपी बापाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनिस असं आरोपी बापाचं नाव आहे. (Gambling father kills daughter over quarrel with wife)

अनिस हा पत्नी सोफिया आणि आपल्या सात वर्षाची मुलगी मायरा सोबत मुंब्रा परिसरात राहत असून तो सध्या बेरोजगार असून त्याला जुगाराचे व्यसन होतं.यावरून पत्नी सोफिया आणि त्याचे नेहमी वाद होत असे. अनिस हा बेरोजगार असल्याने सोफीया स्वतः नोकरी करुन घर चालवत होती मात्र पतीच्या जुगाराच्या व्यसनाला कंटाळून तिने मुलीसोबत वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.
Related Posts
1 of 1,603

हा निर्णय अनिल ला मान्य नव्हता. या मुद्द्यावरुन दोघांचं कडाक्याचं भांडण झालं.

जिल्हा हादरला… ! 59 वर्षीय महिलेची हत्या , एकाला अटक

यावरुन काही दिवसांपूर्वी अनिसचं पत्नीशी जोरदार भांडण झालं. यानंतर पत्नीने त्याला मुलीसोबत मी वेगळी राहते ही धमकी दिली. यानंतर संतापलेल्या अनिसने आपल्या सात वर्षीय मुलीला घेऊन मुंब्रा बायपास भागात जात तिची गळा दाबून हत्या केली. यानंतर अनिसने स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुंब्रा पोलिसांनी याविषयी माहिती कळताच त्यांची घटनास्थळी धाव घेत अनिसला जे.जे. रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी अनिसविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.(Gambling father kills daughter over quarrel with wife)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: