बिल्डरच्या फार्महाऊसवर जुगाराचा अड्डा, पोलिसांची कारवाई अन् 11 जण ताब्यात

0 363
In Shrigonda taluka gambling pot is in full swing while police administration is in a coma

नवी मुंबई –   अंबरनाथ शिवाजीनगर परिसरात अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फार्महाऊसवर छापा मारला. या फार्महाऊसमध्ये कारवाई करत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या अकरा आरोपींना ताब्यात घेतला असून या जुगाराच्या अड्ड्यावर 85 लाख रुपये मिळाल्याची माहिती आहे.

गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात जुगाराचा खेळ मांडण्यात येतो. अनेक क्लब चालक आपलं क्लबमध्ये जुगाराचा खेळ करून लाखो रुपयांची उलाढाल करीत असतात. तर काही पांढरपेशा गर्भश्रीमंत लोकांसाठी देखील अंबरनाथ मध्ये काही बडे हस्ती जुगाराचा खेळ आणि खेळासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देत असतात. अंबरनाथ मध्ये देखील एका बांधकाम व्यावसायिकाने आपल्या शिवाजीनगरच्या फार्मिंग सोसायटीमधील फार्महाऊसवर मोठा जुगाराचा अड्डा तयार केला होता.

या अड्ड्यावर गणेशोत्सवाच्या काळात तिरिक्‍त पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये रोख 85 लाख रुपयांसह 11 आरोपींना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी त्यासंबंधित बांधकाम व्यावसायिकाला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राज्यात मंदिरांचे दरवाजे कधी उघडणार राजेश टोपे म्हणाले …..

Related Posts
1 of 2,107

या कारवाईत पोलिसांनी अरुण विष्णू पाटील,आतिष पंढरीनाथ पाटील,ललित धुपचंद परमार,अजय संजय मोहोरीकर,प्रभात बिरजू जैस्वाल,आनंद रामचंद्र रेड्डी, भास्कर कृष्णा राऊत, जिग्नेश अरविंद परमार, सचिन मल्लप्पा मंचेकर, प्रज्योत जनक म्हात्रे आणि प्रवीण श्रीनिवासराव यांना अटक केली आहे.

हे पण पहा – वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: