गडकरी म्हणाले, साहेब त्याची आम्हाला लाज वाटते, त्यांना वाटते की नाही माहिती नाही!

0 609

अहमदनगर –  शहरात आज दि .२ ऑक्टोबर (October 2) रोजी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP)  राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा झाला. या लोकार्पण सोहळा मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) ज्या ज्या ठिकाणी जागा देईल त्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या पैशांनी विकास करायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे.  या कार्यक्रमानिमित्त शहराचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले एकट्या पुणे (Pune) जिल्ह्यात , कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात जे दूध संकलित होतं तेवढं विदर्भ आणि मराठवाड्यात होत नाही याची आम्हाला लाज वाटली पाहिजे, असं नितीन गडकरी म्हणाले.

नितीन गडकरींनी दूध उत्पादनाबाबत किस्सा सांगितला. ते म्हणाले, एकदा राज्याचे पशू आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे मदर डेअरिच्या मीटिंगला आले होते. त्यावेळी मी मदर डेअरचे चेअरमन आणि भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला, आमच्याकडे 3 लाख लिटर दूध कलेक्शन होतं, ते 10 लाख लिटर कसं होईल.

हे पण पहा  – Ahmednagar | सफर चंद्रा वरची | Ride is on the moon

Related Posts
1 of 1,518

त्यानंतर मी सुनील केदार आणि अधिकाऱ्यांसमोर सर्वांना प्रश्न केला, एकट्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध होतं, तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही, याची आम्हाला लाज आणि शरम वाटते, तुम्हाला वाटते की नाही मला माहिती नाही. पण सुनील केदार आणि मला वाटते, म्हणून आपल्याला ग्रामीण भागात, विशेषत: आपल्या भागामध्ये दुधाच्या उत्पादनामुळे शेतकरी संपन्न झाला, समृद्ध झाला. आत्महत्या करत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

मोठी बातमी ! नांगरे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: