किरण गोसावीच्या अडचणीत आणखी वाढ , पोलीस कोठडीत इतकी वाढ

0 171

पुणे – २ ऑक्टोबर रोजी समीर वानखडे (Sameer Wankhade) यांच्या पथकाने कारवाई करून मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party)  वर छापा टाकला होता या प्रकरणात अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक (NCB)  केली होती. मात्र या प्रकरणात पंच असलेला किरण गोसावी (Kiran Gosavi) याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर किरण गोसावीचा तपास करण्यात आला होता.  या तपासात तो फरार आरोपी असल्याचा समोर आल्याने त्याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.  (Further increase in Kiran Gosavi’s difficulty, so much increase in police custody)

ही कोठडी आज संपल्याने त्याला पुणेमधील शिवाजी नगर कोर्टा (Shivaji Nagar Court) मध्ये हजर करण्यात आला होता.  गोसावीने केलेल्या गुन्ह्यात सायबर गुन्हा देखील असल्याने त्यात फॉरेन्सिक रिपोर्टची गरज असल्याची शक्यता असल्याने न्यायालयाने गोसावीची अजून 3 दिवसाची म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात दाखल करण्यात आलेल्या 4 गुन्ह्यांसह राज्यातील इतर भागातही गोसावीवर 5 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये त्याच्यासोबत आणखी काही जण असून त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाला पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार गोसावीच्या पोलीस कोठडीत 8 तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

तारक मेहता मधील अभिनेत्री ने केला खुलासा.., म्हणाली त्याने केली शरीरसुखाची मागणी

फसवणुकीचं प्रकरणं नेमकं काय?

किरण गोसावीवर पुण्यातील चिन्मय देशमुख या तरुणाची 2018 मध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. मलेशियात नोकरी लावण्याच्या आमिषाने किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी चिन्मयची तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली. तिला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. दुसरीकडे, किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं कार्यरत झाली आहेत. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्ये किरण गोसावीचा शोध घेतला जात होता. (Further increase in Kiran Gosavi’s difficulty, so much increase in police custody)

हे पण पहा –  बेकायदेशिर बायो डिझेलची विक्री करणाऱ्या अकरा आरोपींना अटक 

Related Posts
1 of 1,487
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: