खुनाच्या गुन्ह्यातील फरार महिला आरोपी अटक; DySP संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई

0 167
Chargesheet filed in special Mocca court against notorious Sagar Bhand gang

 

अहमदनगर- DySP संदीप मिटके (Sandeep Mitke) यांच्या पथकाने मोठी कारवाई करत खुनाच्या गुन्ह्यातील दोन वर्षापासून फरार महिला आरोपीस अटक केली आहे.प्रमिला धोंडीराम इंगळे असं अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे.

 

24 मे 2020 रोजी जागेच्या वादावरुन फरार महिला आरोपी प्रमिला धोंडीराम इंगळे व इतर आरोपींनी मिळून मयत गणेश गवळीराम साळवे (वय 28 वर्ष रा. लाटे वस्ती निपाणी वडगाव तालुका श्रीरामपूर) यांची कुऱ्हाड,कोयता, गावठी कट्टा व इतर शस्त्राच्या सहाय्याने हत्या करण्यात आली होती. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हौशीराम गवळीराम साळवे यांच्या फिर्यादीवरून गु. र. नं. 950/2020 भा.द.वि. कलम 302,326,324,143,147,148,149,504,506 सह आर्म ॲक्ट 3,7,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

30 मे 2022 रोजी Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार महिला आरोपी प्रमिला धोंडीराम इंगळे ही आपले नाव व वेश बदलून वडाळा महादेव परिसरात येणार आहे.

 

Related Posts
1 of 2,177

त्यानुसार त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करुन आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वडाळा महादेव परिसरात सापळा लावून महिला आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले आहे व पुढील कार्यवाहीसाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

 

 

सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, Dy.s.p संदीप मिटके , यांचे मार्गदर्शनाखाली म. पो. ना.अश्विनी पवार, पो. ना.नितीन चव्हाण, पो.कॉ. विलास उकिरडे यांनी केली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: