दारु वाहतूक करणाऱ्या वाहनातील मालाची लुटमार करुन विल्हेवाट लावणाऱ्या टोळीतील फरार आरोपी जेरबंद

0

अहमदनगर –  दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी शरद गोपीनाथ वरगडे, वय ४० वर्षे, धंदा- ड्रायव्हर,हे त्यांचे ओळखीचे ट्रान्सपोर्ट मालक शैलेश रावल, रा. कोपरगाव यांचे नॅशनल रोड लाईन्स या ट्रान्सपोर्ट मार्फत कर्मवीर श्री. शंकरराव काळे साखर कारखाना येथून ७ लाख  २८ हजार रुपये किंमतीची देशी दारु ट्रक नं. एमएच-४१ जी-६३९१ हीमध्ये भरुन विष्णूपूरी, ता. अर्धापूर, जि. नांदेड येथे पोहोच करण्यासाठी जात असताना रात्री १०च्या सुमारास झगडे फाटा येथे आले असता आरोपी संतोष गौतम खरात व त्याचे साथीदार योगेश कैलास खरात, धंनजय प्रकाश काळे, सर्व रा. भोजडे चौकी, ता. कोपरगाव व एक अनोळखी इसम यांनी शरद गोपीनाथ वरगडे यांनी  मारहाण करुन फिर्यादीचे ताब्यातील ट्रक दारुसह बळजबरीने चोरुन नेला होता. सदर बाबत शरद गोपीनाथ वरगडे  यांनी कोपरगांव तालुका पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ७६/२०२१ भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष गौतम खरात हा फरार झालेला होता. सदर फरार आरोपीचा  अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अ.नगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असताना पोनि/अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली फरार आरोपी संतोष खरात हा सह्याद्री चौक, एमआयडीसी, अ.नगर परिसरात आलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/सोमनाथ दिवटे, पोसई/गणेश इंगळे, पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे, पोना/शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोका/रविन्द्र घुंगासे, सागर ससाणे, रोहित येमूल, विजय धनेधर, प्रकाश वाघ, चालक पोहेकॉ/ उमाकांत गावडे अशांनी मिळून एमआयडीसी येथे जावून मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे संतोष गौतम खरात, वय- २९ वर्षे, रा. भोजडे चौकी, ता. कोपरगाव, जि. अ.नगर यांस ताब्यात घेवून कोपरगांव तालुका पो.स्टे. येथे हजर केले असून पुढील कार्यवाही कोपरगांव तालुका पो.स्टे. करीत आहेत.

नेहा धुपिया देणार लवकरच GOOD NEWS, सोशल मीडियावर दिली माहिती

 सदरची कारवाई मा. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Posts
1 of 1,153

“जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोचविण्याच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न “

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: