शेतकरी अपहरणाचे गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपीला अटक

0 275

अहमदनगर –  बेलवंडी येथील शेतकरी (farmer) अपहरणाचे गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखे(Ahmednagar Local Crime Branch) ने कारवाई कारत आरोपीला अटक केली आहे . या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने अक्षय सोनवणे या फरार आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  मे २०२१ मध्ये फिर्यादी राजाराम चंदर ढवळे(वय ४४ वर्षे, रा. राजापूर शिवार, ता. श्रीगोंदा)  यांचे राजापूर शिवारातील घोडनदी पात्रालगत असलेल्या गट नं. १४० मधील शेत जमिनीमधून काही आरोपी संतोष राधू शिंदे व त्याचे साथीदारांनी अंदाजे १२ लाख रुपये किमतीची माती बळजबरीने चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी बेलवंडी पो.स्टे. येथे आरोपी विरुध्द फिर्याद दाखल केलेली होती. त्याचा राग मनामध्ये धरुन दि. ०२ सप्टेंबर रोजी आरोपी नामे अक्षय सोनवणे(रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर) याने व त्याचे साथीदारांनी फिर्यादी यांचे ढवळगाव येथून अपहरण करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. त्याबाबत बेलवंडी पो.स्टे. येथे गुरनं. ३६६/२०२१ भादवि कलम ३२६, ३६४, ३२४, ४०५, ५०६, ३४ प्रमाणे आरोपी अक्षय सोनवणे व त्याचे साथीदाराविरुध्द दाखल करण्यात आलेला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयातील मुख्य अक्षय सोनवणे हा फरार झाला होता. या फरार आरोपीचा पोनि/ अनिल कटके (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असताना पोनि / अनिल कटके यांना गोपनीय माहिती मिळाली कि, आरोपी अक्षय सोनवणे हा एका पांढऱ्या रंगाचे महिन्द्रा एक्सयुव्ही गाडी नं. एमएच १६ बीएम ७००१ या गाडीमधून औरंगाबाद – अहमदनगर रोडने अहमदनगर शहराचे दिशेने येत आहे आता लागलीच खडका फाटा टोलनाका येथे सापळा लावल्यास मिळून येतील अशी माहिती मिळाल्याने पथकातील सपोनि / गणेश इंगळे, पोहेकॉ/ भाऊसाहेब काळे, दत्तात्रय गव्हाणे, विजयकुमार वेठेकर, फकीर शेख, पोना/सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, रवि सोनटक्के, पोकॉ/ जालिंदर माने, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, चालक पोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळून खडका फाटा टोलनाका येथे जावून सापळा लावून आरोपी नामे अक्षय सुभाष सोनवणे, वय- २५ वर्षे, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर यास ताब्यात घेवून गुन्ह्याचे तपासकामी बेलवंडी पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे. असून पुढील कार्यवाही बेलवंडी पो.स्टे. करीत आहेत.

उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा मी चालू देणार नाही – किरीट  सोमय्या

Related Posts
1 of 1,603

सदरची कारवाई  मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभकुमार अग्रवाल ,अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, व  आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार केलेली आहे.

 हे पण पहा –राष्ट्रवादी पुन्हा… नामदेव राऊतांचा भाजपला रामराम…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: