मित्रानेच केला दारूच्या नशेत मित्राचा गळा चिरून खून , आरोपीला अटक

0 260

पिंपरी चिंचवड –   तळेगाव एमआयडीसी (MIDC) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वराळे येथे दि. २ सप्टेंबर गुरुवार रोजी एका तरुणाची हत्या झाली होती. या प्रकरणात  पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने आरोपीला १२ तासांत अटक केली असून हा खून दारूच्या नशेत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सुरीने गळा चिरून करण्यात आल्याची माहिती दिली आहे. अशोककुमार (वय ३५, रा. कर्नाटक), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणात पिंटू रामतेणू मंडल(वय २०, रा. कालीयाचेक, जि. मालदा, पश्चिम बंगाल) या आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, अशोककुमार आणि पिंटू मंडल हे एकमेकांचे मित्र होते. दारू पिऊन त्यांच्यात भांडण झाली. दारुच्या नशेत असलेल्या मंडलच्या मनात भांडणाचा राग होता. त्यावेळी त्याने सुरीने अशोक कुमारचा गळा चिरून खून केला. त्यानंतर मंडल पळून गेला. खुनाचा हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

T20 World cup 2021; लवकरच होणार भारतीय संघाची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

Related Posts
1 of 1,481

पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच पिंपरी, चिंचवड, देहूगाव, तळेगाव व पुणे स्टेशन या भागात पथके रवाना केली. एक तरुण ससून रुग्णालयाजवळ संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलीस उपिनरीक्षक राहूल कोळी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मंडल याला ताब्यात घेतले. त्याने अशोक कुमारचा खून केल्याचं पोलिसांना सांगितलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गाेकुळे आणि त्यांच्या पथकानं ही कामगिरी केली.

हे पण पहा – आमदारांच्या दबावातून गुन्हा, काळेंनी दाखवली सीडी पुन्हा दिले जाहीर आव्हान

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: