यांना मिळणार मोफत वाळू… तर काही गावांचा वाळू देण्यास नकार?
शासनाच्या नवीन धोरणानुसार मिळणार मोफत वाढ

Free sand for them – श्रीरामपूर : शहरासह व ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई व शबरी आवास योजनेतील मंजूर लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू दिली जाणार असल्याची माहिती नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी दिली.
राज्य सरकारने ६०० रुपये ब्रासप्रमाणे वाळू विक्रीचे धोरण राबविले आहे. नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देणे तसेच अनधिकृत उत्खननास आळा घालण्याचा यापाठीमागे उद्देश आहे.
चक्क पतीने घेतला पत्नीच्या हाताला चावा
तालुक्यातील नायगाव येथे त्याकरिता डेपो उभारण्यात आला आहे. नायगाव व मातुलठाण येथील मंजूर वाळू गटातून पुरेसा वाळू साठा करण्यात आल्याची माहिती वाकचौरे यांनी दिली. या डेपोमधून सरकारच्या विविध आवास योजनांकरिता मंजूर लाभार्थ्यांना मोफत वाळू दिली जाणार आहे. याकरिता लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने महाखनिज संकेतस्थळावर वाळूची नोंदणी करावयाची आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणीसाठी प्रशासकीय इमारतीत वाळू विक्री नोंदणी केंद्र स्थापन केले आहे. तेथे संपर्क साधावा, असे आवाहन वाकचौरे यांनी केले आहे.
या शासन निर्णयाचा नेमकी कोणाला फायदा होणार हे येणाऱ्या काळातच ठरणार आहे मात्र अहमदनगर जिल्ह्यातील काही गावांनी शासनाच्या वाळू निर्णयाला विरोध केला असून गावातून वाळू उपसा करण्यास विरोध केला आहे काही गावांमध्ये ग्रामपंचायतीने ठराव घेतलेले असतानाही शासनाने त्या ठिकाणी वाळू डेपो दिलेले आहेत याचा ग्रामस्थांनी याला विरोध केल्याने शासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे, आता राज्य शासन काय निर्णय घेतो हे पाहावं लागेल