मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरामध्ये मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे. हे मोकाट कुत्रे (Dogs) रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना चावा घेत आहेत. या मोकाट कुत्र्यांनी आतापर्यंत शहरातील पाच ते दहा जणांना चावा घेतला आहे. यामध्ये दोन वृद्ध ,एक महिला तर एका लहान मुलाचा समावेश आहे. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोकाट कुत्र्यांच्या या प्रकारामुळे शहरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
केवळ श्रीगोंदा शहरात २० हजारांवर भटकी कुत्री असल्याचे पशुसंवर्धन विभागाची २०१५ ची आकडेवारी सांगते. महापालिकेकडे मात्र शहरातील भटक्या कुत्र्यांची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. २०१२ च्या पशूगणनेनुसार शहर व ग्रामीण भागात मिळून एकूर ४३ हजार ७६७ कुत्री आहेत. गेल्या सहा वर्षात या कुत्र्यांची संख्या किमान दुप्पट झाली असावी असा स्वयंसेवी संस्थांचा अंदाज आहे. यावरून या प्रकरणाचे गांभीर्य समजते.