द्राक्ष व्यापाऱ्याची दुबईच्या कंपनीकडून फसवणूक, गुन्हा दाखल

0 269
Shocking! Acquisition of land by posting fake photos, filing a case

सांगली  –   दुबईतील कंपनीने सांगली शहरातील एका व्यापाऱ्यास तब्बल एक कोटी ३६ लाखांचा गंडा (Fraud) घातला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात या प्रकरणात दुबई आणि पाकिस्तानातील कंपनीच्या दोन मालकांसह मुंबईतील दोघा कर्मचाऱ्यांवर पौर्णिमा विजय पाटील (वय ४२, रा. उत्तर शिवाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुबईतील ओपीसी (opc) फूडस्टफ ट्रेडिंग एलएलसी कंपनीचा मालक मुहम्मद फारूक, बद्र अहमद जुमा हुसेन (रा. दुबई) या दोघांसह मुंबईतील व्यवस्थापक दिलीप जोशी (मुंबई),व्यवस्थापक माजीद जलाल (रा. दुबई), अर्थसहाय्य प्रमुख मंगेश गांगुर्डे (मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील यांची पीव्हीआयपी एक्सपोर्ट एलएलपी नावाची आयात निर्यात करणारी कंपनी आहे. ते द्राक्ष, डाळिंब, नारळ, तांदूळ मालाची खरेदी करून निर्यात करतात. २०१९ मध्ये दुबईतील ओपीसी फूडस्टफ कंपनीचा पर्चेस ऑफिसर माजीद जलाल याने पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून मालाची चौकशी केली. त्यावेळी पौर्णिमा यांनी कंपनीविषयी माहिती दिली. दिलीप जोशी हा मुंबई परिसरासाठी काम पहात असल्याचे जलाल याने सांगितले. त्यानंतर पौर्णिमा यांनी पतीसह डिसेंबर २०१९ मध्ये जोशी याची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी गांगुर्डे हा भारतातील काम पाहत असल्याने त्यांची ओळख झाली. त्यानंतर फिर्यादी हे मजीद जलाल आणि कंपनीला भेट देण्यासाठी दुबईला गेले.

….. जेव्हा काँग्रेस नेत्यांनी दिली गडकरींना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर

त्यावेळी कंपनीचा मालक मुहम्मद फारूक, बद्र अहमद हुसेन यांची ओळख झाली. माल निर्यातीसाठी पन्नास टक्के रक्कम आगाऊ व मालाचे कंटेनर  युएईमध्ये मिळाल्याने उर्वरित रक्कम देण्याचा व्यवहार ठरला. त्यानुसार जानेवारी २०२१ मध्ये ऑर्डर मिळाली. त्यानुसार द्राक्षाचे चार आणि डाळिंबाचे तीन असे सात कंटेनर निर्यात केले. त्याची रक्कम एक कोटी ५७ लाख रुपये होते. त्यावेळी तीस टक्के रक्कम फिर्यादी यांना देण्यात आली. उर्वरित रक्कमेसाठी जलाल याच्याशी संपर्क केले.

Related Posts
1 of 2,107

त्यानंतर त्यांनी अमेरिकन डॉलर मध्ये पैसे बँक खात्यावर पाठवल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात पैसे आले नाहीत. आरोपींनी चालढकलपणा करण्यास सुरूवात केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार दुबईतील कंपनीच्या दोघा मालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हे पण पहा –किरीट सोमय्या यांना देणार करारा जवाब | मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलवली तातडीची पत्रकार परिषद

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: