अहमदनगर जिल्ह्यात महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघांना 20 वर्षे सक्त मजुरी..

श्रीगोंदा :- महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang rape)केल्याच्या आरोपावरून श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयाने (Sessions Court Shrigonda) चौघा आरोपींना २० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली. त्यांच्यावर एका पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे आरोप आहेत. त्यानुसार त्यांना ही शिक्षा सुनावली असून, पीडित महिलेला 20 हजार रुपये दंड म्हणून, भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.(Four years hard labor for gang rape of a woman in Ahmednagar district.)
अमोल ताराचंद ऊर्फ खादवडया पवार (४२, बारडगाव सुद्रिक, कर्जत), राज्जाख चिवल्या काळे (४२, येसवडी, कर्जत), सागर गोट्या ऊर्फ बंडू काळे (२९, राक्षसवाडी बु., कर्जत) व चक्क्या ऊर्फ लंकेश इवल्या काळे (३२, बैलबाजार राशीन, कर्जत) या चौघांना सामूहिक बलात्काराच्या आरोपात २० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड तसेच, जबरी चोरीच्या आरोपावरून प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ४ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब एस. शेख यांनी प्रकरणाचा निकाल दिला आहे. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील संगीता ढगे यांनी काम पाहिले. तर ,या खटल्यात ९ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींनी बचावासाठी ४ साक्षीदार तपासले. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांना पैरवी अधिकारी श्रीमती खामकर, पोलीस गणेश ठोंबरे, सुजाता गायकवाड यांनी सहकार्य केले.
याबाबत प्रसिद्धीस दिलेली माहिती अशी की, नमूद महिलेचा पती न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याच्या जामिनासाठी पीडित महिला दिनांक ५ मार्च २०२० रोजी सकाळी कर्जतला येण्यासाठी ताजू इथून बेलवंडी गावाकडे चालत येत होती. त्यावेळी सदरील आरोपींनी संगनमत करून, डाळिंबाच्या बागेत तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. तसेच, चाकूने वार करत तिला जखमी करण्यात आले. या संदर्भात कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Four years hard labor for gang rape of a woman in Ahmednagar district.)